पिंपरी (प्रतिनिधी) :निवडणुकांची धामधूम वाढत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व खासदार सुनेत्रा पवार यांनी पिंपरी-चिंचवड शहरासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली. सध्या सुरू असलेल्या बैठका व चर्चा या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होत असून, सर्व स्तरांतील नागरिकांशी संवाद साधला जात असल्याचे त्यांनी (Sunetra Pawar Statement) सांगितले.
अजित पवार यांच्या पिंपरी-चिंचवड शहराशी असलेल्या नात्याबाबत बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्या, “पिंपरी-चिंचवड शहराबाबत अजितदादांची आत्मीयता मी खूप जवळून पाहिली आहे. त्यांनी या शहरावर स्वतःच्या मुलाप्रमाणे प्रेम केलं आहे. केवळ विकासाचा विचार केला नाही, तर प्रत्यक्षात तो करूनही दाखवला(Sunetra Pawar Statement) आहे.”
पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवारांवर होत असलेल्या टीकांबाबत प्रतिक्रिया देताना त्या म्हणाल्या, “मोठं व्हायचं म्हटलं की टीका होतच असते. त्या सहन करण्याची सवय लागते. मात्र शेवटी आम्हीही माणूस आहोत, आम्हालाही भावना आहेत. त्यामुळे अशा टीकांमुळे वेदना (Sunetra Pawar Statement) होतात.”
आमदार महेश लांडगे यांनी केलेल्या आरोपांवर बोलताना सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट भूमिका मांडली. त्या म्हणाल्या, “आम्ही अजितदादांच्या नेतृत्वाखाली विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत आहोत. शहराला नवचैतन्य देण्याच्या दृष्टीने आम्ही पुढे जात असून, अनावश्यक टीकांकडे दुर्लक्ष करणार (Sunetra Pawar Statement)आहोत.”
अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे एकत्र दिसल्याच्या चर्चांबाबत विचारले असता सुनेत्रा पवार म्हणाल्या, “आम्ही कुटुंब म्हणून नेहमीच एकत्र आहोत. हे आम्ही यापूर्वीही स्पष्ट केलं आहे. त्यामुळे यामध्ये काही वेगळं(Sunetra Pawar Statement) नाही.”
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांच्या या वक्तव्यामुळे पिंपरी-चिंचवडच्या राजकीय चर्चांना पुन्हा एकदा वेग आला(Sunetra Pawar Statement) आहे.
