पिंपरी (दि. १६ मार्च २०२६) – आजच्या अस्थिर जागतिक परिस्थितीत वाढता संघर्ष, असहिष्णुता आणि मूल्यांचा ऱ्हास पाहता भगवान बुद्ध आणि भगवान महावीर यांच्या शांतता, करुणा आणि अहिंसेच्या शिकवणीच मानवजातीला योग्य दिशा देऊ शकतात, असे प्रतिपादन ज्येष्ठ समीक्षक प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस यांनी (Shripal Sabnis) केले.
चिंचवड येथील सायन्स पार्क सभागृहात शनिवारी (दि. १४ मार्च २०२६) कर्मयोगिनी महिला संस्थेतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात कवयित्री सीमा शिरीष गांधी लिखित ‘मी झाड व्हावे’ या काव्यसंग्रहाचे तसेच स्वर्गीय पुष्पाबाई शांतीलाल गांधी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आणि जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित ‘पत्र पुष्पांजली’ या पत्रलेखन स्पर्धेतील निवडक पत्रसंग्रहाचे प्रकाशन करण्यात (Shripal Sabnis)आले.
या प्रसंगी ॲड. प्रार्थना सदावर्ते, प्रा. डॉ. अशोककुमार पगारिया, नीलिमा फाटक, अरुण बोऱ्हाडे आणि दिनेश भोंबड यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील अनेक साहित्यिक, कवी, वाचक, साहित्यप्रेमी आणि संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित (Shripal Sabnis) होते.
प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस पुढे म्हणाले की, समाजात समता, सहअस्तित्व आणि संवेदनशीलता वाढवण्यासाठी बुद्ध आणि महावीर यांच्या विचारांची आज अत्यंत गरज आहे. कवयित्री सीमा शिरीष गांधी यांच्या ‘मी झाड व्हावे’ या काव्यसंग्रहात झाडाच्या सतत देत राहण्याच्या तत्त्वज्ञानाची सुंदर मांडणी करण्यात आली आहे. झाड सावली, फळे आणि प्राणवायू देत जग समृद्ध करते, त्याप्रमाणेच निःस्वार्थ भावनेने समाजासाठी कार्य करण्याचा संदेश या कवितांतून दिला(Shripal Sabnis) आहे.
या कवितांवर ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर आणि बालकवी यांच्या काव्यपरंपरेचा प्रभाव जाणवतो. मुक्तछंदात लिहिलेल्या या कविता साध्या, सहज आणि हृदयस्पर्शी भाषेत वाचकांशी थेट संवाद साधतात. त्यामुळे हा काव्यसंग्रह समृद्ध जाणिवांचा चांदणप्रवास घडवणारी सुंदर साहित्यकृती असल्याचेही त्यांनी नमूद (Shripal Sabnis) केले.
कार्यक्रमात ॲड. प्रार्थना सदावर्ते यांनी ‘पत्र पुष्पांजली’ या पत्रसंग्रहाची समीक्षा केली, तर नीलिमा फाटक यांनी ‘मी झाड व्हावे’ या काव्यसंग्रहाचे भावसौंदर्य उलगडून सांगितले. अरुण बोऱ्हाडे यांनी सीमा गांधी यांच्या काव्य वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्रा. डॉ. अशोककुमार पगारिया यांनी कर्मयोगिनी महिला संस्थेच्या मराठी संवर्धन आणि पर्यावरणविषयक उपक्रमांचे कौतुक (Shripal Sabnis) केले.
‘कुणा पांथस्थाला बुद्ध करण्या वृक्ष ज्ञानी अजान व्हावे, मी झाड व्हावे, मी झाड व्हावे’ या भावपूर्ण ओळींनी समृद्ध असलेला हा काव्यसंग्रह कवयित्री सीमा गांधी यांनी स्नेहल आणि सलोनी या आपल्या दोन्ही सुनांना अर्पण केला(Shripal Sabnis) आहे.
भारतीय टपाल विभागाचे जनसंपर्क अधिकारी दिनेश भोंबड यांनी पत्रलेखनाच्या लोप पावत चाललेल्या संस्कृतीला उजाळा दिल्याबद्दल संस्थेचे कौतुक केले. कार्यक्रमात ‘पत्र पुष्पांजली’ पत्रलेखन स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव करण्यात (Shripal Sabnis) आला.
स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे –
प्रथम क्रमांक (विभागून) : राजश्री बिनायकिया, विभावरी कुलकर्णी
द्वितीय क्रमांक (विभागून) : ॲड. रामचंद्र पाचुणकर, रेणुका कळंबे
तृतीय क्रमांक (विभागून) : डॉ. पौर्णिमा कोल्हे, नेहा शेटे
उत्तेजनार्थ : जयंत कोपर्डेकर, राधिका बडगुजर, अपर्णा जाधव
या सर्व विजेत्यांना रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह आणि ‘पत्र पुष्पांजली’ विशेषांक देऊन सन्मानित करण्यात(Shripal Sabnis) आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी स्नेहल गांधी यांनी गणेश वंदना सादर केली, तर सीमा गांधी यांनी प्रास्ताविक केले. राज गांधी, नील गांधी, सलोनी गांधी, शिरीष गांधी आणि शांतीलाल गांधी यांनी कार्यक्रमाच्या संयोजनात परिश्रम घेतले. प्रा. दिगंबर ढोकले यांनी सूत्रसंचालन केले आणि स्नेहल गांधी यांनी आभार प्रदर्शन (Shripal Sabnis) केले.
