Home माझं पिंपरी चिंचवड PCMC Mayor:PCMC ला अखेर लोकप्रतिनिधींचे नेतृत्व; रवी लांडगे महापौर, शर्मिला बाबर उपमहापौर निश्चित

PCMC Mayor:PCMC ला अखेर लोकप्रतिनिधींचे नेतृत्व; रवी लांडगे महापौर, शर्मिला बाबर उपमहापौर निश्चित

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत चार वर्षांनंतर लोकप्रतिनिधींचा कारभार सुरू. भाजपचे रवी लांडगे महापौर, शर्मिला बाबर उपमहापौरपदी निश्चित. PCMC मधील सत्तासमीकरण आणि पार्श्वभूमी वाचा.

by Admin
Spread the love

पिंपरी-चिंचवड :पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या (PCMC) इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा आज गाठला जात आहे. तब्बल चार वर्षांपासून सुरू असलेली प्रशासकीय राजवट अखेर आज, शुक्रवार (६ फेब्रुवारी) रोजी संपुष्टात येत असून, शहराला २७ वे महापौर मिळणार आहेत. भाजपचे नगरसेवक रवी लांडगे यांची महापौरपदी, तर शर्मिला बाबर यांची उपमहापौरपदी निवड जवळपास निश्चित मानली जात आहे. आज सकाळी ११ वाजता होणाऱ्या विशेष महासभेत यावर अधिकृत शिक्कामोर्तब होणार (PCMC Mayor) आहे.

चार वर्षांचा प्रशासकीय काळ संपला

महानगरपालिकेची मुदत १२ मार्च २०२२ रोजी संपल्यानंतर निवडणुका लांबणीवर पडल्याने PCMC मध्ये प्रशासकीय कारभार सुरू झाला होता. या कालावधीत राजेश पाटील, शेखर सिंह आणि श्रावण हर्डीकर यांनी आयुक्त तथा प्रशासक म्हणून जबाबदारी पार (PCMC Mayor)पाडली.

या चार वर्षांत मुळा नदी सुधार प्रकल्पासाठी २०० कोटी रुपयांचे म्युनिसिपल बाँड्स, हरित सेतू प्रकल्पासारख्या महत्त्वाच्या विकासकामांना गती देण्यात (PCMC Mayor)आली.

१५ जानेवारी रोजी झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपने ८४ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले असून, आता पुन्हा एकदा लोकप्रतिनिधींच्या हातात शहराच्या कारभाराची सूत्रे येत (PCMC Mayor)आहेत.

महापौर पदाचा गौरवशाली वारसा

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे पहिले महापौर होण्याचा मान भोसरीचे ज्ञानेश्वर लांडगे यांनी मिळवला होता. आतापर्यंत २६ महापौरांनी शहराचे नेतृत्व केले आहे. यामध्ये विलास लांडे, लक्ष्मण जगताप यांच्यासारख्या नेत्यांनी आमदारकीपर्यंत मजल मारली, तर आझम पानसरे आणि संजोग वाघेरे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत आपला प्रभाव (PCMC Mayor)दाखवला.

आता २७ वे महापौर म्हणून रवी लांडगे हे या गौरवशाली परंपरेची धुरा सांभाळणार(PCMC Mayor) आहेत.

PCMC मधील सत्तासमीकरण

भाजप (सत्ताधारी) : ८५ (८४ नगरसेवक + १ अपक्ष)

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) : ३७

शिवसेना (एकनाथ शिंदे गट) : ६

महापालिका भवन सज्ज

नव्या महापौर व उपमहापौरांच्या स्वागतासाठी महापालिका भवनातील महापौर व उपमहापौर दालनांची विशेष स्वच्छता व दुरुस्ती करण्यात आली आहे. अँटी-चेंबरपासून फर्निचरपर्यंत सर्व व्यवस्था नव्याने सजवण्यात आली असून, शहराच्या विकासाची सूत्रे पुन्हा एकदा निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या हाती सोपवण्यासाठी प्रशासन पूर्णतः सज्ज झाले (PCMC Mayor)आहे.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00