प्रतिनिधी :पिंपरी-चिंचवड महापालिकेची (PCMC) निवडणूक पार पडल्यानंतर आणि भाजपची सत्ता पुन्हा प्रस्थापित झाल्यानंतर शहरवासीयांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात मालमत्ता कर (Property Tax) आणि पाणीपट्टी (Water Tax) दरात कोणतीही वाढ होणार नसल्याचे संकेत स्पष्ट झाले आहेत. त्यामुळे सामान्य करदात्यांचा आर्थिक भार वाढणार नाही, अशी शक्यता (PCMC Property Tax ) आहे.
नव्या सत्तेचा पहिला ‘गिफ्ट’
१५ जानेवारी रोजी झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपने निर्विवाद बहुमत मिळवले. आज, ६ फेब्रुवारी रोजी नवे महापौर व उपमहापौर पदभार स्वीकारत असून, त्यासोबतच गेल्या चार वर्षांची प्रशासकीय राजवट संपुष्टात येत आहे.दरम्यान, महापालिकेचा आगामी अर्थसंकल्प अंतिम टप्प्यात असून तो २८ फेब्रुवारीपर्यंत स्थायी समितीसमोर (PCMC) सादर केला जाणार (PCMC Property Tax )आहे.
दरवाढीचा प्रस्ताव फेटाळण्याची शक्यता
नियमांनुसार कोणतीही करदरवाढ करायची असल्यास २० फेब्रुवारीपूर्वी सर्वसाधारण सभेची मंजुरी आवश्यक असते. मात्र, सध्याच्या राजकीय परिस्थितीचा विचार करता प्रशासनाकडून दरवाढीचा प्रस्ताव आला, तरी सत्ताधारी भाजप तो मंजूर करणार नाही, अशी चर्चा आहे.निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता आणि सत्तेच्या सुरुवातीलाच जनतेला दिलासा देण्याच्या भूमिकेतून हा निर्णय घेतला जाण्याची दाट शक्यता (PCMC Property Tax ) आहे.
अर्थसंकल्पाची जय्यत तयारी
महापालिका आयुक्त तथा प्रशासक श्रावण हर्डीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सन २०२६-२७ चा अर्थसंकल्प तयार करण्याचे काम सुरू आहे.जर २८ फेब्रुवारीपर्यंत स्थायी समितीचे गठन झाले नाही, तर राज्य सरकारकडून मुदतवाढ घेऊन अर्थसंकल्प सादर केला जाईल.दरम्यान, करवाढीचे सावट दूर झाल्याने सामान्य नागरिक आणि करदात्यांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत(PCMC Property Tax ) आहे.

