Home महाराष्ट्र Railway Budget India:पुणे–लोणावळा प्रवाशांच्या समस्यांकडे रेल्वेचे दुर्लक्ष:रेल्वे अर्थसंकल्पावर चिंचवड प्रवासी संघाचा निषेध

Railway Budget India:पुणे–लोणावळा प्रवाशांच्या समस्यांकडे रेल्वेचे दुर्लक्ष:रेल्वे अर्थसंकल्पावर चिंचवड प्रवासी संघाचा निषेध

पुणे–लोणावळा लोकल प्रवाशांच्या समस्यांकडे रेल्वे अर्थसंकल्पात दुर्लक्ष झाल्याचा आरोप करत चिंचवड प्रवासी संघाने निषेध नोंदवला आहे. चौपदरीकरण, नवीन स्थानके, लोकल वाढ आणि बंद गाड्या सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.

by Admin
Spread the love

चिंचवड, ता. ०१ – रेल्वेच्या अर्थसंकल्पात पुणे जिल्ह्यातील प्रवाशांच्या मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप करत चिंचवड प्रवासी संघाने तीव्र निषेध नोंदवला आहे. पुणे–लोणावळा दरम्यान सुरू असलेल्या उपनगरीय रेल्वे सेवेने नुकतीच ४७ वर्षे पूर्ण केली असून या मार्गावर १७ स्थानके आणि दररोज सुमारे ४२ लोकल गाड्यांद्वारे प्रवाशांची ये-जा सुरू  (Railway Budget India) आहे.

या ६४ किलोमीटर लांबीच्या मार्गावर दररोज अंदाजे सव्वा लाखांहून अधिक प्रवाशांची चढ-उतार होत आहे. मात्र लोकल सेवेसाठी स्वतंत्र तिसरी व चौथी मार्गिका उपलब्ध नसल्याने लोकल वाढवणे शक्य नसल्याचे रेल्वे प्रशासनाकडून वारंवार सांगण्यात आले आहे. सध्या या मार्गावर १५० हून अधिक लांब पल्ल्याच्या प्रवासी व मालगाड्यांची ये-जा होत असल्याने दुहेरी मार्गावर प्रचंड ताण निर्माण झाला (Railway Budget India) आहे.

या पार्श्वभूमीवर चिंचवड प्रवासी संघाने १९९० सालापासून पुणे–लोणावळा रेल्वे मार्गाचे चौपदरीकरण पूर्ण करण्यात यावे, अशी सातत्याने मागणी केली आहे. यासाठी रेल्वेमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच पुणे व मुंबईतील रेल्वे अधिकाऱ्यांकडे निवेदने देऊन प्रत्यक्ष भेटी आणि आंदोलनेही करण्यात आली. मात्र आजतागायत ठोस तोडगा निघालेला  (Railway Budget India) 

मात्र ११ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली. यासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेळोवेळी पाठपुरावा केल्याबद्दल प्रवासी संघाने त्यांचे आभार मानले आहेत. या प्रकल्पासाठी सुमारे ५१०० कोटी रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली असून सन २०२५ ते २०२९ या कालावधीत तिसरी व चौथी उपनगरीय रेल्वे मार्गिका उभारण्याचा तपशीलवार आराखडा तयार करण्यात आला आहे. या प्रकल्पात केंद्र सरकार, राज्य सरकार, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे महापालिका आणि पिंपरी-चिंचवड महापालिका यांचा सहभाग (Railway Budget India) आहे.

पुणे जिल्हा हा मोठा औद्योगिक पट्टा असल्याने लोकल फेऱ्या वाढवणे अत्यावश्यक असल्याचे संघाचे म्हणणे आहे. कष्टकरी, कामगार, महिला आणि विद्यार्थ्यांसाठी परवडणारी वाहतूक व्यवस्था म्हणून लोकल सेवेचा विस्तार व्हावा, अशी मागणी करण्यात (Railway Budget India) आली आहे.

तसेच माजी रेल्वे राज्यमंत्री सुरेश कलमाडी यांनी १९९६ मध्ये घोषित केलेल्या चिंचवड–रोहा नवीन रेल्वे मार्ग तसेच पुणे–तळेगाव–चाकण मार्गे नाशिकपर्यंत नवीन रेल्वे मार्ग उभारण्याच्या प्रस्तावालाही गती देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या मार्गामुळे खडकी, दापोडी, कासारवाडी, पिंपरी आणि चिंचवड परिसरातील नागरिकांना तसेच चाकण आणि नाशिक औद्योगिक क्षेत्रात ये-जा करणाऱ्या कामगारांना मोठा फायदा होणार (Railway Budget India) आहे.

कोरोना काळात बंद करण्यात आलेल्या मुंबई–कोल्हापूर सह्याद्री एक्सप्रेस, पुणे–कल्याण मार्गे नाशिक–भुसावळ एक्सप्रेस, बारामती–कर्जत पॅसेंजर शटल आणि मुंबई–पुणे मार्गे सोलापूर एक्सप्रेस या गाड्या तातडीने सुरू करण्यात याव्यात, अशीही मागणी करण्यात आली  (Railway Budget India) आहे.

आकुर्डी ते देहूरोड दरम्यान साडेपाच किलोमीटर अंतर असून आकुर्डीच्या पुढे सुमारे दोन किलोमीटरवर रावेत येथे नवीन रेल्वे स्थानक उभारण्यात यावे, अशी मागणी प्रवासी संघाने केली आहे. रावेत परिसरात सध्या दीड लाखांहून अधिक लोकसंख्या असून या स्थानकामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड तसेच मुंबई व इतर राज्यांमध्ये जाणाऱ्या प्रवाशांना मोठी सोय होणार  (Railway Budget India) आहे.

चिंचवड रेल्वे स्थानकावर कोकण, हैदराबाद, सोलापूर, बेंगळुरू आणि मद्रास मार्गावरील महत्त्वाच्या एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यात यावा, अशीही मागणी करण्यात आली आहे. यामुळे पुणे रेल्वे स्थानकावरील गर्दीचा ताण कमी होईल, प्रवाशांचा वेळ, खर्च आणि शारीरिक श्रम वाचतील, असे संघाचे म्हणणे (Railway Budget India) आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00