352
निगडी–पिंपरी परिसरात सुरू असलेल्या मेट्रो रेल्वे प्रकल्पामुळे रस्त्यांची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. विशेषतः भक्ती शक्ती उड्डाणपूलाखालील श्रीकृष्ण मंदिर ते अंकुश चौक या मार्गावर गेल्या सहा महिन्यांपासून मोठ्या खड्ड्यांची समस्या कायम असून हा रस्ता वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक बनला आहे. काही दिवसांपूर्वी एका दुचाकीस्वाराचा याच ठिकाणी खड्ड्यात अडकल्याने गंभीर अपघात झाला आणि स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट(Nigdi Pothole Accident) उसळली.
