Home आरोग्य PCMC Power Cut :पिंपरी-चिंचवडमध्ये वादळी पावसामुळे १९ तास वीज खंडित; नागरिकांचे हाल, चौकशी व नुकसान भरपाईची मागणी

PCMC Power Cut :पिंपरी-चिंचवडमध्ये वादळी पावसामुळे १९ तास वीज खंडित; नागरिकांचे हाल, चौकशी व नुकसान भरपाईची मागणी

दापोडी, सांगवी, पिंपळे गुरवसह पिंपरी-चिंचवडमध्ये 19 तास वीज खंडित. वादळी पावसामुळे हजारो नागरिक प्रभावित; महावितरणकडे चौकशी व नुकसान भरपाईची मागणी.

by Admin
Spread the love

प्रतिनिधी :पिंपरी-चिंचवड परिसरातील दापोडी, फुगेवाडी, सांगवी (नवीन व जुनी), पिंपळे गुरव आणि कासरवाडी या भागांमध्ये २ एप्रिल दुपारी सुमारे २ वाजल्यापासून ३ एप्रिल सकाळी ९.१० वाजेपर्यंत दीर्घकाळ वीजपुरवठा खंडित झाला. सुमारे १९ तास चाललेल्या या वीज खंडितीमुळे हजारो नागरिक आणि व्यावसायिकांना मोठा फटका(PCMC Power Cut ) बसला.

 

प्राथमिक माहितीनुसार, अचानक आलेल्या वादळी वारा आणि पावसामुळे हा बिघाड झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, भारतीय हवामान विभागाकडून याबाबत पूर्वसूचना देण्यात आली होती का आणि असल्यास महावितरणने योग्य तयारी का केली नाही, असा सवाल उपस्थित केला जात(PCMC Power Cut ) आहे.

 

या घटनेमुळे खाद्यपदार्थ, डेअरी आणि औषध साठ्याचे नुकसान झाले असून, वरिष्ठ नागरिक व रुग्णांना मोठा त्रास सहन करावा(PCMC Power Cut ) लागला.

 

दरम्यान, ज्ञानमाता माहिती अधिकार नागरिक समूहाचे अध्यक्ष सरदार रविंद्र सिंह यांनी महावितरणकडे सविस्तर माहिती मागवत चौकशीची मागणी केली आहे. तसेच, जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करून सर्व प्रभावित ग्राहकांना नियमांनुसार तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणीही करण्यात आली (PCMC Power Cut )आहे.

 

या प्रकरणी महावितरणकडून अधिकृत स्पष्टीकरण आणि पुढील कार्यवाहीकडे नागरिकांचे लक्ष लागले(PCMC Power Cut ) आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00