Home गुन्हे Fake Godman Case:आणखी एक भोंदू कांड.पुण्यात भोंदूला अटक; दैवी शक्तीच्या नावाखाली महिलेवर अत्याचार प्रकरण उघड

Fake Godman Case:आणखी एक भोंदू कांड.पुण्यात भोंदूला अटक; दैवी शक्तीच्या नावाखाली महिलेवर अत्याचार प्रकरण उघड

पुण्यात दैवी शक्तीचा दावा करून महिलेवर अत्याचार करणाऱ्या भोंदू ऋषीकेश वैद्यला गुन्हे शाखेकडून अटक. सोशल मीडियातून ओळख, गुंगीचे औषध देऊन अत्याचार; आणखी पीडितांचा शोध सुरू.

by Admin
Spread the love

प्रतिनिधी :पुण्यात दैवी शक्ती असल्याचे भासवून महिलेवर अत्याचार करणाऱ्या भोंदूला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. ऋषीकेश वैद्य असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तो पिंपरी परिसरातून पोलिसांच्या जाळ्यात अडकला. या प्रकरणी ३५ वर्षीय महिलेने फिर्याद दिली (Fake Godman Case) आहे.

तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर २०२३ मध्ये पीडित महिलेची आरोपीशी सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली. मूळ वसईचा असलेला आरोपी “माझ्यात दैवी शक्ती आहे, ईश्वर उपासनेचे तंत्र शिकवतो,” असे सांगून महिलेचा विश्वास संपादन करत (Fake Godman Case) होता.

यानंतर आरोपी पुण्यात येऊन मांजरी परिसरात महिलेची भेट घेतली. त्यावेळी तिला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. तसेच, आरोपीने महिलेला वसई येथे बोलावून तेथेही तिच्यावर अत्याचार केल्याचे तपासात निष्पन्न झाले (Fake Godman Case)आहे.

दरम्यान, नाशिकमधील अशाच एका भोंदू प्रकरणाची माहिती समोर आल्यानंतर पीडित महिलेने धाडस दाखवत पोलिसांकडे तक्रार दाखल केली. सुरुवातीला वसईतील माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यानंतर पुढील तपासासाठी हा गुन्हा पुण्यातील मांजरी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात (Fake Godman Case)आला.

आरोपीचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या चार पथकांनी तपास सुरू केला होता. आरोपी पिंपरी परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर युनिट-६च्या पथकाने सापळा रचून त्याला अटक (Fake Godman Case)केली.

या संदर्भात गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी सांगितले की, आरोपीने अशाच प्रकारे इतर महिलांनाही फसवून अत्याचार केल्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा प्रकारचा अनुभव आलेल्या महिलांनी पुढे येऊन तक्रार द्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले(Fake Godman Case) आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00