प्रतिनिधी:पिंपरी-चिंचवडच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरणात मोठी हालचाल पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का देत विद्यमान नगरसेवक प्रवीण भालेकर यांनी पक्षाला निरोप दिला असून, ते भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश करण्याच्या तयारीत (Pravin Bhalekar BJP Entry)आहेत.
आमदार महेश लांडगे यांच्या कार्यशैलीवर ठाम विश्वास ठेवून आणि त्यांच्या नेतृत्वाने प्रभावित होऊन भालेकर यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे संकेत मिळाले आहेत. त्यांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक संघटनांत खळबळ निर्माण झाली आहे.
प्रवीण भालेकर यांच्या प्रवेशामुळे पिंपरी-चिंचवडमधील भाजपची ताकद अधिक भक्कम होणार असून, राष्ट्रवादी काँग्रेसला राजकीयदृष्ट्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. यासोबतच भालेकर यांचे समर्थक आणि कार्यकर्तेदेखील भाजपकडे झुकतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या गणितात बदल होण्याची दाट (pravin Bhalekar )शक्यता आहे.
या घडामोडींनंतर शहरातील राजकीय तापमान चांगलेच वाढले असून, पुढील काही दिवसांत आणखी काही नगरसेवक किंवा स्थानिक नेते पक्षांतर करतील का, याकडे सर्वांचे लक्ष (pravin Bhalekar )आहे.
