Home प्रेरणा / यशकथा Sakshama PCMC Iaf:सक्षमा प्रकल्पाला IAF परिषदेत गौरव | महिलांच्या वस्तूंना प्रतिसाद

Sakshama PCMC Iaf:सक्षमा प्रकल्पाला IAF परिषदेत गौरव | महिलांच्या वस्तूंना प्रतिसाद

IAF परिषदेत सक्षमा प्रकल्पातील महिलांनी तयार केलेल्या हस्तनिर्मित वस्तूंना आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा उत्कृष्ट प्रतिसाद; 28 हजारांची विक्री, 75 फ्रेम्स भेट.

by Admin
Spread the love

इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ फॅसिलिटेशन (IAF) तर्फे लवळे येथील सांदिपनी होमेटेल येथे आयोजित परिषदेत पिंपरी-चिंचवड महापालिका समाज विकास विभाग आणि टाटा स्ट्राईव्ह यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या ‘सक्षमा’ प्रकल्पाला विशेष दाद मिळाली. या प्रकल्पांतर्गत कार्यरत महिला बचत गटांनी तयार केलेल्या घरगुती आणि हाताने बनवलेल्या वस्तूंना विदेशी कंपन्यांच्या प्रतिनिधींनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणात खरेदी (Sakshama PCMC Iaf )केली.

महिला सक्षमीकरणासाठी राबविल्या जाणाऱ्या ‘सक्षमा’ उपक्रमांतर्गत महिलांनी तयार केलेल्या वारली नोटबुक, फाईल्स, पेन स्टँड, कँडल, सरस्वती फ्रेम्स, फ्रीज मॅग्नेट, कॉटन पाऊच, गांधी खण टोपी आदी वस्तू परिषदेत विक्रीसाठी मांडल्या होत्या. या सर्व वस्तूंना भरघोस प्रतिसाद मिळून एकूण २८ हजार रुपयांची (Sakshama PCMC Iaf ) विक्री झाली.

तसेच, उपस्थित कंपन्यांच्या प्रतिनिधींना सक्षमातील महिलांनी तयार केलेल्या ७५ सरस्वती फ्रेम्स भेटवस्तू म्हणून देण्यात आल्या. या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या दुबईस्थित गुरविंदर सिंह यांनी वारली कॉम्बो डायरीची विशेष मागणी केल्याची माहिती (Sakshama PCMC Iaf )महापालिका उपायुक्त ममता शिंदे यांनी दिली.

https://youtu.be/FU1FAhet7FE?si=c5feT5J


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00