प्रतिनिधी :नोकरी जाण्याची सततची भीती, घरच्या जबाबदाऱ्या आणि कंपनीतील वाढता दबाव… आयटी क्षेत्र आज गंभीर टप्प्यावर आले आहे. एकीकडे तंत्रज्ञानाचा गाजावाजा, तर दुसरीकडे कंपन्यांकडून प्रकल्प संपला की कर्मचारी बाहेर असा संदेश.
पुण्यालगतच्या हिंजवडीमध्ये रोज ऑफिसला जाणारे आयटीयन्स (IT Job Crisis)या असुरक्षिततेच्या वादळात सापडले आहेत.
अनुभवी कर्मचाऱ्यांवर कात्री; तरुणांना स्वस्तात संधी
प्रोजेक्ट संपताच मिळणाऱ्या नोटिसेस, अचानक बोलावल्या जाणाऱ्या एचआर मीटिंग्स आणि क्षणांत संपलेली वर्षानुवर्षांची नोकरी… अशी वास्तव परिस्थिती आज अनेकांच्या आयुष्यात घडते आहे.
३० ते ४५ वयोगटातील अनुभवी कर्मचाऱ्यांना सर्वाधिक फटका बसत आहे. कमी पगारातील उमेदवारांना प्राधान्य दिल्याने अनुभवी कर्मचाऱ्यांची नोकरी (IT Job Crisis)धोक्यात येत आहे.
काही कर्मचाऱ्यांचे म्हणणे —
“कंपनीला १०–१५ वर्षे दिली, आणि शेवटी हातात केवळ सक्तीचा राजीनामा!”
नवीन नोकरीसाठी महिनोनमहिने प्रतीक्षा, कर्जे, कुटुंबीयांच्या जबाबदाऱ्या…(IT Job Crisis) मानसिक तणाव प्रचंड वाढला आहे.
कायदेशीर सुरक्षिततेचा अभाव
कर्मचारी कपातीदरम्यान पारदर्शकता नसणे, योग्य भरपाई मिळत नसणे आणि बेरोजगारी भत्त्याचा अभाव… त्यामुळे आयटी कर्मचारी पूर्णपणे असुरक्षित राहतात.
काही कंपन्या बीजीव्हीची भीती दाखवून कर्मचाऱ्यांवर दबाव(IT Job Crisis) आणत असल्याच्या तक्रारी आहेत.
तंत्रज्ञानाच्या भविष्यदृष्टीत मागे पडत असलेले भारतीय आयटी
आयटी कंपन्या आउटसोर्सिंग, कॉस्ट कटिंग आणि शॉर्ट-टर्म बिलिंगमुळेच चालत असल्याने एआय, सायबर सिक्युरिटी, सेमीकंडक्टर, रोबोटिक्ससारख्या भविष्यातील टप्प्यांवर मागे राहण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त (IT Job Crisis) केली आहे.
प्रसूती रजेनंतर महिलेला सक्तीचा राजीनामा — मातृत्व हक्कांवर घाव
“प्रसूती रजेनंतर एका आयटी कंपनीने महिला कर्मचाऱ्याला राजीनामा द्यायला भाग पाडले. तिच्या एकाकी परिस्थितीचा फायदा घेत कंपनीने केलेले हे कृत्य मातृत्व हक्कांचा अपमान आहे,” अशी प्रतिक्रिया एका आयटी (IT Job Crisis)कर्मचाऱ्याने दिली.
कायदा तुमच्या बाजूला आहे; तक्रार करा – कामगार विभाग
कामगार उपायुक्त निखिल वाळके म्हणाले,
“देशातील कामगार कायदे आयटी क्षेत्रालाही लागू आहेत. कर्मचाऱ्यांवर अन्याय झाल्यास त्यांनी तक्रार करावी. कायद्यानुसार कारवाई(IT Job Crisis) केली जाते.”
आयटी क्षेत्रातील चमकदार इमारतींच्या मागे लपलेली वेदना…
हिंजवडीतील एका आयटीयन्सचे शब्द मनाला चटका लावतात:
“कंपनीच्या कार्डवर आमचे नाव असते, पण आमच्या भविष्यावर कोणाचेच(IT Job Crisis) नाव नाही.”
