Home माझं पिंपरी चिंचवड Kalarang Event:कलारंग’तर्फे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा भव्य गौरव सोहळा

Kalarang Event:कलारंग’तर्फे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा भव्य गौरव सोहळा

निगडी येथे ‘कलारंग’ संस्थेतर्फे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा गौरव सोहळा उत्साहात पार पडला. योगेश सोमण यांनी भाषा संवर्धनावर भर दिला.

by Admin
Spread the love

पिंपरी-चिंचवड : कला, साहित्य आणि संस्कृतीच्या जतनासाठी कार्यरत असलेल्या ‘कलारंग’ सांस्कृतिक कला संस्थेच्या वतीने महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा ‘सारस्वतांचा गौरव सोहळा’ शुक्रवारी (३ एप्रिल) निगडी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात उत्साहात पार (Kalarang Event) पडला.

 

या सोहळ्यात महाराष्ट्र साहित्य परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष योगेश सोमण, प्रमुख कार्यवाह स्वाती महाळंक आणि कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर यांचा तसेच कार्यकारिणी सदस्य सुनील महाजन, सुनेत्रा मंकणी, अंजली कुलकर्णी, प्रसाद मिरासदार, माधव राजगुरु, डॉ. नितीन संगमनेरकर, डॉ. आशुतोष जावडेकर, राजन लाखे, पुरुषोत्तम काळे आणि प्रभाकर ओव्हाळ यांचा सत्कार करण्यात  (Kalarang Event)आला.

 

दिग्गजांची उपस्थिती

 

कार्यक्रमाची सुरुवात पद्मश्री ज्येष्ठ समाजसेवक गिरीश प्रभुणे आणि मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. या वेळी सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित (Kalarang Event)होते.

 

१०० वे साहित्य संमेलन पिंपरी-चिंचवडमध्ये व्हावे” – आमदार अमित गोरखे

 

आमदार अमित गोरखे यांनी यावेळी बोलताना पिंपरी-चिंचवड शहरात १०० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्याची इच्छा व्यक्त केली. शहरातील साहित्यप्रेमींचा उत्साह आणि सांस्कृतिक क्षमता लक्षात घेता, हे ऐतिहासिक संमेलन येथे व्हावे यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. साहित्यिक समाजाला दिशा देतात, अशा व्यक्तिमत्त्वांचा गौरव करणे हे भाग्याचे असल्याचेही त्यांनी नमूद (Kalarang Event)केले.

 

भाषा संवर्धन आणि तरुणांना जोडण्यावर भर – योगेश सोमण

 

नवनिर्वाचित अध्यक्ष योगेश सोमण यांनी आपल्या भाषणात संस्थेच्या ११९ वर्षांच्या परंपरेचा गौरव करत जबाबदारीची जाणीव व्यक्त केली. हे पद एखाद्या व्यक्तीच्या कल्पनेचे नसून सामूहिक परिश्रमांचे फलित असल्याचे त्यांनी स्पष्ट(Kalarang Event) केले.

 

मराठी भाषेचे संवर्धन आणि साहित्याची गोडी जनसामान्यांमध्ये निर्माण करणे हे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे सांगत त्यांनी येत्या काळात वर्षभराचे नियोजन करण्याचा मानस व्यक्त केला. विशेषतः ३० ते ३५ वयोगटातील तरुणांना पुन्हा वाचन संस्कृतीशी जोडण्यासाठी ‘अभिवाचन’सारख्या उपक्रमांवर भर दिला जाणार असल्याचे त्यांनी (Kalarang Event)सांगितले.

 

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी दोन महत्त्वाच्या बाबींचा उल्लेख केला. आतापर्यंतच्या ९९ संमेलनाध्यक्षांपैकी २५ अध्यक्ष फर्ग्युसन महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असल्याची अभिमानास्पद बाब त्यांनी नमूद केली; मात्र महिला अध्यक्षांची संख्या केवळ ७ असल्याने यावर गांभीर्याने विचार होण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट (Kalarang Event)केले.

 

साहित्यातून भारतीय अस्मितेचा जागर व्हावा” – गिरीश प्रभुणे

 

प्रमुख पाहुणे गिरीश प्रभुणे यांनी नवनिर्वाचित कार्यकारिणीला मार्गदर्शन करताना सांगितले की, परिषदेचे वातावरण सकारात्मक झाले असून योग्य नियोजन केल्यास मोठे कार्य घडू शकते. ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ आणि चोखामेळा यांच्या परंपरेप्रमाणे जनसामान्यांपर्यंत पोहोचणारा साहित्यप्रवाह निर्माण करण्याची गरज त्यांनी व्यक्त  (Kalarang Event)केली.

 

सांस्कृतिक मेजवानीने रंगत

‘कलारंग’चे अध्यक्ष आमदार अमित गोरखे, उपाध्यक्ष शैलेश लेले तसेच आशा नेगी, संजना मगर, राम गायकवाड, प्रवीण पोळ आणि मुकुंद वेदपाठक यांच्या नियोजनाखाली कार्यक्रम पार पडला. निवेदन रविंद्र खरे यांनी (Kalarang Event)केले.

 

या सोहळ्याला मोठ्या संख्येने साहित्यप्रेमी आणि रसिक उपस्थित होते. कला आणि साहित्याचा सुंदर संगम अनुभवताना उपस्थित नागरिक भारावून गेले. शेवटी संयोगिता खुडे यांनी ‘पसायदान’ सादर करून कार्यक्रमाची सांगता (Kalarang Event)केली.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00