Home गुन्हे Dehuroad Fraud Case:देहूरोडमध्ये ज्वेलर्सकडून २६.६० लाखांची फसवणूक | ६५७ ग्रॅम सोने गायब

Dehuroad Fraud Case:देहूरोडमध्ये ज्वेलर्सकडून २६.६० लाखांची फसवणूक | ६५७ ग्रॅम सोने गायब

देहूरोड परिसरातील सुंधा ज्वेलर्समध्ये दागिने दुरुस्तीच्या बहाण्याने २६.६० लाख रुपये आणि ६५७ ग्रॅम सोन्याची फसवणूक. ४० हून अधिक नागरिकांची फसवणूक, आरोपी फरार.

by Admin
Spread the love

देहूरोड परिसरात ज्वेलर्स व्यवसायाच्या आडून मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दागिने दुरुस्ती व नवीन दागिने तयार करून देण्याच्या नावाखाली तब्बल २६ लाख ६० हजार रुपये आणि ६५७ ग्रॅम सोन्याची अफरातफर करण्यात आली (Dehuroad Fraud Case) आहे.

 

या प्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अद्याप फरार आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ जानेवारी २०२६ ते ३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत सुभाष चौक, मेन बाजार येथील ‘सुंधा ज्वेलर्स’ येथे ही घटना घडली. याबाबत ४६ वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली (Dehuroad Fraud Case)आहे.

 

अंबालाल जिवाजी सोनी (वय अंदाजे ५६) आणि रोहित अंबालाल सोनी (वय अंदाजे ३०, रा. विकासनगर, किवळे, पुणे) अशी आरोपींची नावे असून त्यांनी फिर्यादी तसेच इतर नागरिकांचा विश्वास संपादन केला होता. दागिने दुरुस्ती, नवीन दागिने तयार करणे तसेच रोख रक्कम स्वीकारून त्यांनी ग्राहकांची फसवणूक केली. त्यानंतर दुकान बंद करून दोघेही पसार (Dehuroad Fraud Case) झाले.

 

या प्रकरणात फिर्यादीसह सुमारे ४० हून अधिक नागरिकांची फसवणूक झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले(Dehuroad Fraud Case) आहे.

 

या संदर्भात भारतीय न्याय संहिता कलम ३१६ (२), ३१६ (५), ३१८ (४), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक डोंगळे करीत (Dehuroad Fraud Case) आहेत.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00