प्रतिनिधी :पिंपरी-चिंचवडमधील मोशी परिसरातून एक अतिशय संतापजनक घटना समोर आली आहे. एका ७ वर्षांच्या निष्पाप चिमुरडीवर ४० वर्षीय शेजाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एम.आय.डी.सी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संपूर्ण परिसरातून संताप व्यक्त होत (Child Abuse Bhosri)आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मोशी येथील विनायकनगर, शिवशंभो कॉलनीमध्ये ही घटना घडली. रामु कुंजल निसाद (वय ४० वर्षे) असे आरोपीचे नाव आहे. फिर्यादीनुसार, आरोपीने २ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास पीडित मुलीला आपल्या खोलीत बोलावून घेतले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तसेच, कोणालाही सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी (Child Abuse Bhosri ) दिली.
धक्कादायक बाब म्हणजे, ३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी पुन्हा आरोपीने पीडितेला आपल्या खोलीत बोलावून अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. यावेळी पीडित मुलीच्या आईने आणि आत्याने खिडकीतून हा सर्व प्रकार स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला. आपल्या मुलीसोबत घडणारा हा भयानक प्रकार पाहून त्यांनी तात्काळ पोलिसांत धाव (Child Abuse Bhosri) घेतली.
