पिंपरी (दि. ०४ फेब्रुवारी २०२६) :‘सर्वांना आनंद देणे ही अतिशय महत्त्वाची बाब असून विद्यार्थ्यांनी आपल्या कृतीतून ही वृत्ती आचरणात आणावी,’ असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिका शोभा जोशी यांनी केले. खिंवसरा पाटील शिक्षण संकुल, गणेशनगर, थेरगाव येथे मंगळवार (दि. ०३ फेब्रुवारी २०२६) रोजी समरसता साहित्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने आयोजित तेराव्या एकदिवसीय समरसता बालकुमार विद्यार्थी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय मनोगतात त्या बोलत (Samarasata Sahitya Parishad)होत्या.
संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. सतीश गोरडे होते. यावेळी महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले, डाॅ. नीता मोहिते, व्याख्याते प्रा. दिगंबर ढोकले, नितीन बारणे, मुख्याध्यापिका मंजुषा गोडसे, समरसता साहित्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखाध्यक्षा मानसी चिटणीस आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित( Samarasata Sahitya Parishad) होते.
ढोल-ताशांच्या गजरात पारंपरिक वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी मान्यवरांसह उत्साहात ग्रंथदिंडी काढून संमेलनाची सुरुवात केली. त्यानंतर औक्षण, शिवगर्जना, अनुष्का चिटणीस हिने सादर केलेली गणेशवंदना, दीपप्रज्वलन, प्रतिमापूजन व सरस्वतीस्तवनाने उद्घाटन सत्राची सुरुवात( Samarasata Sahitya Parishad) झाली.
प्रास्ताविकात मानसी चिटणीस यांनी, ‘विद्यार्थ्यांची साहित्यरुची वृद्धिंगत व्हावी या उद्देशाने गेली तेरा वर्षे विविध संकल्पना केंद्रस्थानी ठेवून या संमेलनाचे आयोजन केले जात आहे,’ अशी माहिती( Samarasata Sahitya Parishad) दिली.
ॲड. सतीश गोरडे यांनी, ‘सामाजिक समरसता प्रस्थापित व्हावी हा भारतीय संविधानाचा उद्देश असून समरसता विद्यार्थी साहित्य संमेलन त्याचे प्रभावीपणे अधोरेखन करते,’ असे मत व्यक्त( Samarasata Sahitya Parishad) केले.
तर पुरुषोत्तम सदाफुले यांनी विद्यार्थ्यांना ‘भावी काळात देशाचे स्वातंत्र्य व मूल्ये अबाधित राखण्यासाठी योगदान द्यावे,’ असे आवाहन केले. जयश्री श्रीखंडे यांनी उद्घाटन सत्राचे आभार ( Samarasata Sahitya Parishad)मानले.
उद्घाटनानंतर विवेकानंद सुतार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या सद्भावना सत्रात श्रावणी चिलखे (सावित्रीबाई फुले), कार्तिकी गाडे (राजमाता जिजाऊ), शिवम तोडकर (सुभाषचंद्र बोस), सिओन सरोदे (स्वामी विवेकानंद) या विद्यार्थ्यांनी महापुरुषांच्या वेषभूषेत त्यांच्या विचारांचे प्रभावी सादरीकरण केले. यावेळी विवेकानंद सुतार यांनी, ‘आपल्या संपर्कातील प्रत्येक व्यक्तीशी सद्भावनेने वागा,’ असा संदेश दिला. सत्राचे सूत्रसंचालन देवयानी इंगळे हिने( Samarasata Sahitya Parishad) केले.
ज्येष्ठ साहित्यिका संगीता पुराणिक यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या बाल कविसंमेलनाची सुरुवात कृष्णा खिल्लारे व सहकाऱ्यांनी सादर केलेल्या पोवाड्याने झाली. सुप्रिया ठोसर, धनश्री हजारे, दीक्षा सरोदे, गीता निर्मळ, अंकिता धीवर, भूमिका खंडागळे, रूपाली तायड, भूमी मोरे यांनी स्वरचित कविता सादर केल्या; तर हर्षवर्धन गाडेकर याने गोष्ट( Samarasata Sahitya Parishad) सांगितली.
साहित्यिक गप्पा या सत्रात राजन लाखे यांनी विविध उदाहरणे व काव्यपंक्तींच्या माध्यमातून कवितालेखनाची प्रक्रिया उलगडून सांगितली. लेखनापूर्वी भरपूर वाचन करा व यशासाठी अथक परिश्रम आवश्यक आहेत, असा कानमंत्र त्यांनी दिला. या सत्राचे सूत्रसंचालन केतन सांगडे याने केले.
कथाकथन सत्रात मुख्याध्यापिका अश्विनी बाविस्कर यांच्या अध्यक्षतेखाली रुद्रांग धुमाळ, वैष्णवी कांबळे, मानसी पाटील, सियारा सरोदे, आलिया शेख यांनी कथाकथन केले. अश्विनी बाविस्कर यांनी स्वतः दोन रंजक कथा सादर करून आपल्या वाचिक अभिनयाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. यावेळी ‘मूकाभिनयातून म्हणी ओळखा’ या खेळाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सूत्रसंचालन रुद्र कदम याने केले.
समारोप सत्रात नगरसेविका शालिनी गुजर, सामाजिक कार्यकर्ते ॲड. आकाश गुजर, कुमुदिनी घोडके यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच नरेंद्र पेंडसे, अभय पोकर्णा, सुहास पोफळे, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. तुकाराम पाटील, राज आहेरराव, अशोक गोरे, राधाबाई वाघमारे, राजेंद्र घावटे, सविता इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते.
खिंवसरा पाटील शिक्षण संकुलातील शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारीवर्ग तसेच राजेंद्र भागवत, नीलेश शेंबेकर, हेमंत जोशी, पंजाबराव मोंढे, श्रद्धा चटप, स्वाती भोसले, सुरेश जोशी, राजू जाधव, प्रदीप गांधलीकर यांनी संयोजनात सहकार्य केले.
स्मिता कुलकर्णी यांनी उद्घाटन व समारोप सत्रांचे सूत्रसंचालन केले; तर सुहास घुमरे यांनी आभार मानले. सामुदायिक वंदे मातरम् ने संमेलनाचा समारोप झाला.
