Home गुन्हे Alandi Double Murder :आळंदी दुहेरी हत्याकांड उघड: काही तासांत आरोपी अटकेत

Alandi Double Murder :आळंदी दुहेरी हत्याकांड उघड: काही तासांत आरोपी अटकेत

आळंदीतील ठाकरवाडी परिसरात घडलेल्या दुहेरी हत्याकांडाचा पोलिसांनी काही तासांत उलगडा केला. सहा वर्षांच्या चिमुकलीसह ज्येष्ठ महिलेची हत्या करणारा आरोपी विनायक भवारी अटकेत.

by Admin
Spread the love

प्रतिनिधी :आळंदी परिसरात घडलेल्या दुहेरी हत्याकांडाचा पोलिसांनी अवघ्या काही तासांत उलगडा करत आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.या प्रकरणी विनायक तुकाराम भवारी (वय ३५, रा. जुन्नर, जि. पुणे) याला पोलिसांनी अटक केली असून तो सध्या पोलिसांच्या ताब्यात (Alandi Double Murder)  आहे.

 

केळगाव-हनुमानवाडी येथील ठाकरवाडी परिसरात गुरुवारी मध्यरात्री ही धक्कादायक घटना घडली. संगीता दत्तात्रय गवारी या नेहमीप्रमाणे इंद्रायणी कॅन्सर हॉस्पिटलमध्ये रात्रीच्या पाळीसाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या घरी सहा वर्षांची नात धनश्री सोनू केदारी आणि तिची देखभाल करणाऱ्या ७९ वर्षीय मंगल शिंदे या दोघीच (Alandi Double Murder) होत्या.

 

याच संधीचा फायदा घेत आरोपीने घरात प्रवेश केला. गाढ झोपेत असलेल्या धनश्रीचा गळा आवळून खून करण्यात आला, तर मंगल शिंदे यांच्या डोक्यावर वार करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात(Alandi Double Murder)  आली.

 

गुरुवारी सकाळी संगीता गवारी घरी परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. घरातील भीषण दृश्य पाहून त्यांनी आरडाओरडा केला. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती (Alandi Double Murder) दिली.

 

घटनास्थळी पोहोचलेल्या आळंदी पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला आणि काही तासांतच संशयिताचा माग काढत आरोपी विनायक भवारी याला अटक(Alandi Double Murder)  केली.

 

पोलीस निरीक्षक एस. बी. नरके यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि तक्रारदार महिलेचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. मात्र, कौटुंबिक वादामुळे ते मागील एक महिन्यापासून वेगळे राहत होते. आरोपी वारंवार घरी येत असल्याने मंगल शिंदे त्याला जाब विचारत असत. तसेच लहानगी धनश्री देखील त्याला विरोध करत (Alandi Double Murder) होती.

 

याच रागातून आरोपीने प्रथम मंगल शिंदे यांच्यावर हल्ला केला. त्यावेळी धनश्रीने आरडाओरड केल्याने संतापाच्या भरात आरोपीने तिचाही गळा आवळून खून (Alandi Double Murder) केला.

 

या घटनेने परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली (Alandi Double Murder) आहे.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00