प्रतिनिधी :पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत प्रभाग क्र. २७ मधील रहाटणी परिसरात अनधिकृत बांधकामांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. वृंदावन कॉलनी, तापकीर मळा चौक आणि तापकीर नगर येथे एकूण सुमारे ८८.८७ चौरस मीटर क्षेत्रावरील बांधकामे हटविण्यात (PCMC Action) आली.
महापालिकेने अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी कठोर भूमिका घेत ही मोहीम राबवली. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आदेशान्वये आणि अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात (PCMC Action)आली.
‘ग’ क्षेत्रीय अधिकारी किशोर ननवरे यांच्या अधिपत्याखालील पथकाने ही कारवाई पार पाडली. यासाठी एमएसएफ जवान, पोलीस कर्मचारी, मजूर व यंत्रसामग्रीची मदत घेण्यात (PCMC Action) आली.
शहरात अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले असून, नागरिकांनी बांधकाम करताना नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले (PCMC Action) आहे.
