पिंपरी-चिंचवड (प्रतिनिधी) : हिंदू समाजातील जाती-पंथातील भेदभाव दूर करून एकात्मतेचा संदेश देण्यासाठी चिंचवड येथे ‘सकल हिंदू संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. चिंचवड देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत असून, समाज व राष्ट्र उभारणीत सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले (Hindu Unity Event) आहे.
रविवार, दिनांक २९ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५.१५ वाजता केशवनगर, चिंचवड येथील श्री मोरया गोसावी क्रीडांगण येथे हे संमेलन पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी विविध धार्मिक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार (Hindu Unity Event)आहे.
या संमेलनाच्या माध्यमातून ‘हिंदू सारा एक’ हा संदेश समाजाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. धर्मरक्षण, संस्कृती संवर्धन आणि राष्ट्रीय एकात्मता यांसाठी समाजाने एकत्र येणे आवश्यक असल्याचे आयोजकांनी नमूद केले (Hindu Unity Event)आहे.
तसेच, या उपक्रमात सर्व हिंदू बांधवांनी सहकुटुंब सहभागी होऊन सामाजिक ऐक्याची भावना अधिक दृढ करण्याचे आवाहन करण्यात आले (Hindu Unity Event) आहे.
“मंगलमूर्ती मोरया” या जयघोषात हा कार्यक्रम पार पडणार असून, मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहतील, अशी अपेक्षा जितेंद्र देव,विश्वस्त क्रमांक २ आणि सर्व विश्वस्त मंडळ, चिंचवड देवस्थान ट्रस्ट यांच्याकडून व्यक्त करण्यात आली (Hindu Unity Event) आहे.
