Home प्रेरणा / यशकथा Shabdanshi Jodale Nate:माण येथे “शब्दांशी जोडले नाते” पुस्तकाचे विद्यार्थ्यांच्या हस्ते अनोखे प्रकाशन

Shabdanshi Jodale Nate:माण येथे “शब्दांशी जोडले नाते” पुस्तकाचे विद्यार्थ्यांच्या हस्ते अनोखे प्रकाशन

माण येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये २७ मार्च २०२६ रोजी लेखिका कल्पना बंब यांच्या “शब्दांशी जोडले नाते” पुस्तकाचा विद्यार्थ्यांच्या हस्ते अनोखा प्रकाशन सोहळा पार पडणार.

by Admin
Spread the love

प्रतिनिधी :प्रणाली प्रकाशन आणि न्यू इंग्लिश स्कूल, माण यांच्या संयुक्त विद्यमाने लेखिका सौ. कल्पना चांदमलजी बंब लिखित “शब्दांशी जोडले नाते” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शुक्रवार, २७ मार्च २०२६ रोजी सकाळी १० वाजता न्यू इंग्लिश स्कूल, माण येथे आयोजित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, साहित्यविश्वात प्रथमच हा प्रकाशन सोहळा विद्यार्थ्यांच्या हस्ते पार पडणार असून, हा उपक्रम एक अनोखी व प्रेरणादायी संकल्पना ठरणार (Shabdanshi Jodale Nate) आहे.

 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कु. मिसबाह शफिक खान (इयत्ता ११ वी) असणार असून, कु. रेशमा राकेश प्रजापती (इयत्ता ११ वी) यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. प्रमुख पाहुण्या म्हणून कु. अर्पिता भाऊराव पवार (इयत्ता ९ वी) उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवयित्री सीमा गांधी करणार (Shabdanshi Jodale Nate)आहेत.

 

या सोहळ्यास साहित्यिक नारायण कुंभार, प्रा. तुकाराम पाटील, संपादक सुभाष लोंढे, कवयित्री राधाबाई वाघमारे, संत साहित्याचे अभ्यासक अशोक महाराज गोरे, गुणगंत कामगार सुभाष चव्हाण, कवी विलास कुंभार, साहित्यिक सुरेश कंक तसेच बंब, ओसवाल आणि मुथा परिवारातील सदस्य उपस्थित राहणार (Shabdanshi Jodale Nate) आहेत.

 

कार्यक्रमाचे आयोजन प्रणाली प्रकाशनच्या सौ. शामला पंडित-दीक्षित यांनी केले असून, न्यू इंग्लिश स्कूल, माणचे मुख्याध्यापक अंबादास रोहे यांचे सहकार्य लाभले आहे. या प्रकाशन सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले (Shabdanshi Jodale Nate) आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00