Home प्रेरणा / यशकथा Marathi Recitation:अभिवाचन स्पर्धेत साईनाथ बालक मंदिर प्रथम | जागतिक मराठी साहित्य स्पर्धा, पिंपरी

Marathi Recitation:अभिवाचन स्पर्धेत साईनाथ बालक मंदिर प्रथम | जागतिक मराठी साहित्य स्पर्धा, पिंपरी

पिंपरी-चिंचवड येथे झालेल्या पूज्य पुरुषोत्तम दारव्हेकर स्मृती जागतिक मराठी साहित्य अभिवाचन स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत साईनाथ बालक मंदिरने प्रथम क्रमांक पटकावला. २० संघांचा सहभाग, नामवंत परीक्षक व मान्यवरांची उपस्थिती.

by Admin
Spread the love

अभिवाचन स्पर्धेत साईनाथ बालक मंदिर प्रथम

पिंपरी, दि. ८ फेब्रुवारी २०२६ : मधुश्री कला अविष्कार, पिंपरी-चिंचवड आणि रंगगंध कलासक्त न्यास, चाळीसगाव यांच्या संयुक्त विद्यमाने पूज्य पुरुषोत्तम दारव्हेकर स्मृती जागतिक मराठी साहित्य अभिवाचन स्पर्धेची प्राथमिक फेरी नुकतीच पार पडली. ही स्पर्धा ७ व ८ फेब्रुवारी २०२६ रोजी ज्ञानप्रबोधिनी, निगडी येथील नाट्य विभागात आयोजित करण्यात आली (Marathi Recitation)होती.

 

या स्पर्धेत साईनाथ बालक मंदिर या संस्थेने प्रथम क्रमांक पटकावला. ‘अशी मी काव्यप्रेमी’ या संस्थेला द्वितीय, तर त्रिवेणी कला या संस्थेला तृतीय क्रमांक मिळाला. ज्ञानप्रबोधिनी गुरुकुल यांना उत्तेजनार्थ पारितोषिक प्रदान करण्यात ( Marathi Recitation)आले.

 

वैयक्तिक अभिवाचन प्रकारात रश्मी साटम, पूर्वा धारप, शिल्पा बिबीकार, रमेश वाकनीस आणि मंजिरी बाम हे पारितोषिक विजेते (Marathi Recitation) ठरले.

 

या प्रसंगी प्रमुख अतिथी उपमहापौर सौ. शर्मिला बाबर यांनी, “अशा स्पर्धांच्या माध्यमातून वाचन आणि श्रवण संस्कृतीचे संवर्धन होत असून, ही अत्यंत आनंदाची बाब आहे,” असे मत व्यक्त केले. विशेष उपस्थितीत सौ. अपर्णा राजू मिसाळ म्हणाल्या, “मराठीला अभिजात दर्जा प्राप्त झाला असून, तो टिकवून ठेवण्याचे महत्त्वाचे कार्य अशा संस्था करीत आहेत. ही बाब भविष्यकाळासाठी सकारात्मक (Marathi Recitation) आहे.”

 

मधुश्रीचे श्री. राज अहेरराव यांनी आपल्या मनोगतातून अभिवाचनाबाबत मार्गदर्शन करताना सांगितले की, “अभिवाचन करताना अभिनय आणि वाचन यांचा समतोल आवश्यक असतो. अभिनयाला मर्यादा असावी, विरामचिन्हांचे भान ठेवावे आणि वाचनासाठी संहिता पाठ असणे गरजेचे(Marathi Recitation) आहे.”

 

या स्पर्धेत एकूण २० संघांनी सहभाग नोंदवला होता. परीक्षण श्री. नरेश गुंड आणि सौ. विनिता माने पिसाळ यांनी केले. दोन्ही परीक्षकांनी स्पर्धकांना मार्गदर्शनपर मनोगते व्यक्त(Marathi Recitation) केली.

 

कार्यक्रमाला रंगगंध, चाळीसगावचे प्रतिनिधी श्री. अशोक अडावदकर उपस्थित होते. मधुश्रीच्या अध्यक्षा माधुरी ओक यांनी प्रास्ताविक केले. मंच व्यवस्थापनाची जबाबदारी सौ. रेणुका हजारे, सौ. राधिका बोर्लीकार आणि श्री. पी. बी. शिंदे यांनी सांभाळली. तर संयोजन श्री. अजित देशपांडे, सौ. अश्विनी कुलकर्णी, श्री. चिंतामणी कुलकर्णी, नेहा कुलकर्णी, अनिकेत गुहे आणि सुनील देशपांडे यांनी (Marathi Recitation)केले.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उज्वला केळकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. चंद्रकांत शेडगे यांनी (Marathi Recitation)केले.

 

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00