Home गुन्हे PCMC Crime News :पिंपरी-चिंचवडमध्ये दुचाकी चोरी करणारा सराईत अटकेत; १.७० लाखांच्या ४ गाड्या जप्त, २ गुन्हे उघड

PCMC Crime News :पिंपरी-चिंचवडमध्ये दुचाकी चोरी करणारा सराईत अटकेत; १.७० लाखांच्या ४ गाड्या जप्त, २ गुन्हे उघड

पिंपरी-चिंचवडमध्ये दुचाकी चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला अटक. १.७० लाखांच्या ४ गाड्या जप्त; दापोडी व खडक पोलीस ठाण्यातील २ गुन्हे उघड.

by Admin
Spread the love

प्रतिनिधी :पिंपरी-चिंचवड शहरात मोटारसायकल चोरी करून त्या धाराशिव जिल्ह्यात विक्री करणाऱ्या सराईत आरोपीला गुन्हे शाखा युनिट 01 ने अटक केली आहे. आरोपीकडून तब्बल १ लाख ७० हजार रुपये किमतीच्या ४ दुचाकी वाहने जप्त करण्यात आली असून दोन गुन्हे उघडकीस आले (PCMC Crime News) आहेत.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर विशेष पथक तयार करण्यात आले होते. दापोडी पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक 33/2026 (भा.न्या.सं. कलम 303(2)) च्या तपासादरम्यान गुप्त माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा माग काढण्यात (PCMC Crime News)आला.

 

त्यानुसार पोलिसांचे पथक धाराशिव येथे जाऊन शंकर भरत देवकुळे (वय 33, रा. फकिरानगर, वैराग नाका, धाराशिव) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून होंडा हॉर्नेट ही दुचाकी जप्त करण्यात आली. पुढील चौकशीत त्याने पिंपरी-चिंचवड व पुणे परिसरातून आणखी ३ दुचाकी चोरी केल्याची कबुली(PCMC Crime News) दिली.

 

यामध्ये दोन स्प्लेंडर मोटारसायकली आणि एक अ‍ॅक्टिवा यांचा समावेश आहे. आरोपी चोरी केल्यानंतर वाहनांच्या मूळ नंबर प्लेट बदलून बनावट नंबर वापरत असल्याचे तपासात निष्पन्न झाले (PCMC Crime News)आहे.

 

या कारवाईत दापोडी पोलीस ठाण्यासह पुणे शहरातील खडक पोलीस ठाण्यातील (गुन्हा क्र. 68/2026) असे एकूण दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. उर्वरित दोन वाहनांबाबत अधिक तपास सुरू (PCMC Crime News)आहे.

 

ही कारवाई गुन्हे शाखा युनिट 01 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात (PCMC Crime News)आली.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00