Home आरोग्य HPV Vaccination :१४ वर्षांच्या मुलींच्या एचपीव्ही लसीकरणाची शंभरी पार; वैद्यकीय विभागाची प्रभावी मोहीम

HPV Vaccination :१४ वर्षांच्या मुलींच्या एचपीव्ही लसीकरणाची शंभरी पार; वैद्यकीय विभागाची प्रभावी मोहीम

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या एचपीव्ही लसीकरण मोहिमेला उत्तम प्रतिसाद; १४ वर्षांच्या ११९ मुलींचे मोफत लसीकरण पूर्ण. गर्भाशय मुखाच्या कर्करोग प्रतिबंधासाठी महत्त्वपूर्ण पाऊल.

by Admin
Spread the love

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या गर्भाशय मुखाच्या कर्करोग प्रतिबंधासाठीच्या एचपीव्ही (ह्युमन पॅपिलोमा व्हायरस) लसीकरण मोहिमेला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या मोहिमेत आतापर्यंत एकूण ११९ मुलींचे लसीकरण यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले असून, लसीकरणाची शंभरी पार झाली (HPV Vaccination) आहे.

 

ही मोहीम केवळ आजारापासून बचावापुरती मर्यादित नसून, महिलांच्या दीर्घकालीन आरोग्य सुरक्षिततेसाठी आणि समाजातील कर्करोगाचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची ठरत(HPV Vaccination) आहे.

 

महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे तसेच आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील १४ वर्षे वयोगटातील मुलींसाठी ही मोहीम राबविण्यात येत (HPV Vaccination)आहे.

 

भारत सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार १४ वर्षे वयोगटातील (१४ वर्षे पूर्ण, पण १५ वर्षे अपूर्ण) मुली एचपीव्ही लसीसाठी पात्र आहेत. मात्र, काही विशिष्ट परिस्थितींमध्ये लसीकरण टाळले किंवा पुढे ढकलले जाते. यामध्ये लक्ष्य वयोगटाबाहेरील मुली, गर्भधारणा असलेली व्यक्ती, पूर्वी एचपीव्ही लस (गार्डासिल किंवा सर्वाव्हॅक) घेतलेली असल्यास, लसीच्या घटकांमुळे (यीस्ट) तीव्र ऍलर्जी असलेली व्यक्ती तसेच मध्यम ते गंभीर आजार असलेल्या व्यक्तींचा समावेश होतो. अशा व्यक्तींना पूर्णपणे बरे झाल्यानंतरच लसीकरण करण्याचा सल्ला दिला(HPV Vaccination) जातो.

 

महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत मोफत एचपीव्ही लसीकरणाची सुविधा उपलब्ध आहे. तसेच सर्व लाभार्थ्यांची नोंद U-WIN पोर्टलवर केली जात (HPV Vaccination)आहे.

 

महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने पालकांना आवाहन केले आहे की, आपल्या १४ वर्षे वयोगटातील मुलींना जवळच्या महानगरपालिका रुग्णालयात नेऊन मोफत लसीकरणाचा लाभ घ्यावा आणि कर्करोगमुक्त भविष्यासाठी पुढाकार(HPV Vaccination) घ्यावा.

 

“एचपीव्ही लसीकरण मोहिमेसाठी सर्व मनपा रुग्णालये व दवाखाने पूर्णपणे सुसज्ज आहेत. आवश्यक मनुष्यबळ, सुविधा आणि औषधसाठा उपलब्ध असून डॉक्टर व कर्मचारी ही मोहीम प्रभावीपणे राबवत आहेत. या उपक्रमाद्वारे मुलींना सुरक्षित लस देऊन भविष्यात गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण कमी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. पालकांनी वेळेत लसीकरण करून घ्यावे,” असे डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी (HPV Vaccination)सांगितले.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00