प्रतिनिधी :ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर पिंपरी-चिंचवड शहरावर पाणीटंचाईचे गंभीर संकट ओढवण्याची चिन्हे दिसत आहेत. पवना धरणातून उचलल्या जाणाऱ्या पाण्याबाबतची तब्बल १४३ कोटी रुपयांची थकबाकी तात्काळ भरण्याचा कडक इशारा जलसंपदा विभागाने महापालिकेला दिला आहे. अन्यथा शहराचा पाणीपुरवठा खंडित करण्याचा इशारा देण्यात आल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले (PCMC Water Crisis)आहे.
दरम्यान, ही थकबाकी केवळ पाणीपट्टीपुरती मर्यादित नसून सांडपाणी प्रक्रिया न केल्यामुळे आकारलेल्या दंडाचाही त्यात समावेश आहे. जलसंपदा विभागाच्या माहितीनुसार, महापालिका सांडपाण्यावर पूर्ण प्रक्रिया न करता ते थेट नदीपात्रात सोडत आहे. शहरातील एकूण ३४५ एमएलडी क्षमतेपैकी केवळ २७५ एमएलडी पाण्यावरच प्रक्रिया केली जात असल्याचा ठपका ठेवत हा दंड आकारण्यात आला(PCMC Water Crisis) आहे.
या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाने महापालिकेला नोटीस पाठवून थकबाकी तत्काळ भरण्याचे निर्देश दिले आहेत. सध्या उन्हाळ्यामुळे पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढलेली असताना, पाणीपुरवठा खंडित झाल्यास शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात (PCMC Water Crisis)आहे.
दरम्यान, महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने आपली बाजू मांडताना पाणीपट्टी नियमित भरली जात असल्याचा दावा केला आहे. नुकतेच ८ कोटी रुपये अदा केल्याचेही त्यांनी सांगितले; मात्र दंडाच्या रकमेवरून अद्यापही वाद कायम असल्याचे समोर आले (PCMC Water Crisis)आहे.
