प्रतिनिधी :पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय परिसरात शनिवारी सायंकाळी ट्रान्सफॉर्मरचा भीषण स्फोट होऊन आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. सायंकाळी सुमारे ७.३० वाजण्याच्या सुमारास झालेल्या या स्फोटामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. मात्र, अग्निशामक दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ (Chinchwad Transformer Blast) टळला.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस आयुक्तालयाजवळील एका इमारतीबाहेरील ट्रान्सफॉर्मरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाला. या बिघाडामुळे जोरदार स्फोट होऊन ट्रान्सफॉर्मरने पेट घेतला. स्फोटाचा आवाज प्रचंड असल्याने परिसरातील नागरिक घाबरून घराबाहेर धावले. आगीच्या ज्वाळा शेजारील इमारतीच्या पार्किंगपर्यंत पोहोचल्याने तेथील वाहनांनाही धोका निर्माण झाला(Chinchwad Transformer Blast) होता.
अग्निशामक दलाची तत्काळ कारवाई
घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड अग्निशामक दलाच्या तीन गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी जलद हालचाल करत पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळवले. त्यांच्या वेळेवर केलेल्या कारवाईमुळे आग इमारतीच्या वरच्या मजल्यांपर्यंत पसरण्यापासून रोखण्यात यश (Chinchwad Transformer Blast)आले.
वीजपुरवठा खंडित
घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून महावितरणकडून परिसरातील वीजपुरवठा तात्पुरता बंद करण्यात आला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, ट्रान्सफॉर्मरचे मोठे नुकसान झाले आहे. वर्दळीच्या ठिकाणी घटना घडल्याने काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू(Chinchwad Transformer Blast) होते.
