(विवेक कुलकर्णी)श्री विहार, श्री नगरी परिसरातील नागरिकांनी एकत्र येत २००९ साली अत्यंत श्रद्धेने आणि सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून श्री गणेश मंदिराची स्थापना केली. परिसरातील सर्व नागरिकांच्या सामूहिक प्रयत्नातून साकारलेले हे मंदिर आज केवळ धार्मिक स्थळ न राहता, सामाजिक एकोप्याचे व सांस्कृतिक परंपरेचे केंद्र बनले (ShriVihar Ganesh Mandir) आहे.
या पवित्र कार्यासाठी अनेक दानशूर व्यक्ती, स्थानिक नागरिक व समाजहितैषींनी सर्वतोपरी मदत केली. श्री गणेशांची संगमरवरी, साडेतीन फूट उंचीची देखणी व सुबक मूर्ती जयपूर येथून खास मागवण्यात आली असून तिचे तेज, शांत भाव आणि कलात्मक सौंदर्य भाविकांचे लक्ष वेधून(ShriVihar Ganesh Mandir) घेतात.

नांदेड येथील प्रसिद्ध मंदिर बांधकाम व्यावसायिक दगडगावे यांच्या मार्गदर्शनाखाली या मंदिराचे बांधकाम जवळपास दीड वर्षांच्या कालावधीत पूर्ण झाले. मंदिराचा कळस खास पंढरपूर येथून आणण्यात आला असून, कासव आणि मुशक राजगुरूनगर येथून घडवून मागवण्यात आले आहेत. स्थापत्यशास्त्र, सौंदर्य आणि भक्ती यांचा सुंदर संगम साधणारे हे मंदिर प्रख्यात गणपती पुळे येथील मंदिराची प्रतिकृती असल्याचे मानले (ShriVihar Ganesh Mandir) जाते.

f
या मंदिराच्या स्थापनेमुळे श्री विहार परिसरात विविध जाती, पंथ आणि विचारधारांचे लोक एकत्र आले. श्रद्धा हीच एकता निर्माण करते, याचे हे उत्तम उदाहरण ठरले आहे. येथील गणेश मंडळ नोंदणीकृत असून, दरवर्षी पर्यावरणपूरक गणेश मूर्तीची स्थापना करून सात दिवसांचा गणेश महोत्सव उत्साहात साजरा केला (ShriVihar Ganesh Mandir) जातो.
गणेश जयंतीच्या पावन मुहूर्तावर येथे दरवर्षी एक सुंदर सामाजिक परंपरा जपली जाते. परिसरातील नवविवाहित दाम्पत्यांना पूजनाचा मान दिला जातो. त्यानंतर सर्व नागरिकांना महाप्रसादासाठी आमंत्रित केले जाते. लहानथोर, श्रीमंत-गरिब, सर्वजण एकत्र येऊन भक्तिभावाने महाप्रसादाचा लाभ घेतात. यावर्षी या परंपरेचे १७ वे वर्ष असून, पाच नवविवाहित जोडपी पूजेसह यज्ञासाठी बसली (ShriVihar Ganesh Mandir) होती.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. देशपांडे गुरुजी काका यांनी विधीवत पौरहित्य केले. श्रींची महाआरती झाल्यानंतर भाविकांनी भक्तिभावाने महाप्रसादाचा लाभ (ShriVihar Ganesh Mandir) घेतला.
या मंदिराच्या उभारणीत तत्कालीन देहूरोड कॅन्टोन्मेंटच्या उपाध्यक्ष आशाताई कस्पटे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक मान्यवरांनी विशेष परिश्रम घेतले. रामकृष्ण मोरे महाविद्यालयाचे प्राध्यापक सूर्यकांत पवार, उद्योजक साईकुमार नामला, शाम नायर, राजेश विभुते, भूषण पंचवाडकर, ज्ञानेश्वर कस्पटे, सतीश पाटील, नामदेव हांडे, हरिसचंद्र ढमढेरे, हरिभाऊ देशमुख, अनिल लोखंडे, विवेक कुलकर्णी, राजीव हार्गापूर, शशिकांत कुंभार, राजेंद्र सस्ते, विश्वास घागुर्डे, राजेंद्र पाटील, अजितकुमार, प्रमोद बावनकर, नितांत सोनवणे सर्वांनी या मंदिरासाठी मोलाचे योगदान (ShriVihar Ganesh Mandir) दिले.
यावर्षीच्या गणेश जयंती महोत्सवाचे अध्यक्षपद प्रा. सूर्यकांत पवार यांनी भूषवले. हा उत्सव यशस्वी करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांना अनिल लोखंडे, भूषण पंचवाडकर, हरिभाऊ देशमुख, संदीप ढमढेरे, राजेंद्र पाटील आणि राजेंद्र सस्ते यांनी मोलाचे(ShriVihar Ganesh Mandir) सहकार्य केले.
आज श्री विहार, श्री नगरीतील हे श्री गणेश मंदिर केवळ श्रद्धेचे केंद्र न राहता सामाजिक सलोखा, पर्यावरणपूरक विचार आणि सांस्कृतिक वारसा जपणारे प्रेरणास्थान बनले आहे. एकतेतून शक्ती निर्माण होते, हा संदेश देत हे मंदिर भाविकांच्या मनात अढळ स्थान निर्माण(ShriVihar Ganesh Mandir) करत आहे.
