पुणे (प्रतिनिधी) : गझल मंथन साहित्य संस्था आयोजित तिसरे अखिल भारतीय महिला गझल संमेलन येत्या २२ फेब्रुवारी रोजी पुण्यातील स्वा. सावरकर अध्यासन केंद्र येथे संपन्न होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ गझलकार डॉ. स्नेहल कुलकर्णी यांची, तर स्वागताध्यक्षपदी गझलकार वैशाली माळी यांची निवड करण्यात आली (Gajhal Sammelan) आहे.
या संमेलनात ज्येष्ठ गझलकार ममता सिंधुताई यांना ‘गझलक्रांती’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. तसेच गझलकार दिपाली कुलकर्णी व मानसी जोशी यांना ‘गझलयात्री’ पुरस्कार, अनुजा कौतिक दांडगे यांना ‘गझलसखी’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. कै. जबनाबेन सोमजी पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शहादा (जि. नंदुरबार) येथील सोहंम कोलाईड्स तसेच श्री. शरद सोमजी पाटील व सौ. हेमलता शरद पाटील यांच्या तर्फे दिला जाणारा ‘गझलध्यास’ पुरस्कार यंदा धाराशिव येथील गझलकार स्नेहलता झरकर-अंदूरे यांना प्रदान करण्यात येणार (Gajhal Sammelan)आहे.
संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ गझलकार ज्योत्स्ना रजपूत यांच्या हस्ते होणार असून, प्रमुख अतिथी म्हणून श्रद्धा खानविलकर, निर्मिती कोलते आणि कौतिक दांडगे उपस्थित राहणार (Gajhal Sammelan) आहेत.

संमेलनाध्यक्षा डॉ. स्नेहल कुलकर्णी या गेली सोळा वर्षे गारगोटी ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे ‘ति’ची’ हा काव्यसंग्रह, ‘स्नेहांकुर’ हा वृत्तबद्ध काव्यसंग्रह तसेच ‘स्नेहांकित’ आणि ‘दिशांतर’ हे गझलसंग्रह प्रकाशित झाले आहेत. ‘काव्यरसदा’ हा त्यांचा वृत्तबद्ध रसग्रहणात्मक लेखसंग्रहही प्रसिद्ध आहे. गझलरंगसह विविध राज्यस्तरीय पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. साहित्य आणि वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. कोल्हापूर आकाशवाणी केंद्रावरून त्यांच्या कविता, गझल व ललितलेखांचे नियमित प्रसारण होत असते. गेली पाच वर्षे त्या गझल मंथन साहित्य संस्थेच्या मार्गदर्शक म्हणून कार्यरत असून नवोदित कवी-लेखकांना प्रोत्साहन देत (Gajhal Sammelan) आहेत.
नव्या पिढीतील नामांकित गझलकार व पुणे विभाग सचिव वैशाली माळी यांची स्वागताध्यक्षपदी निवड झाली आहे.गझल रसिकांनी या संमेलनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष अनिल कांबळे, उपाध्यक्ष वसुदेव गुमटकर, सचिव जयवंत वानखडे, संयोजक डॉ. शिवाजी काळे व संमेलन समन्वयक प्रदीप तळेकर यांनी केले (Gajhal Sammelan) आहे.
