Home गुन्हे Lodha Society Crime:लोढा सोसायटीतील फ्लॅटमध्ये अवैध जुगार अड्डा

Lodha Society Crime:लोढा सोसायटीतील फ्लॅटमध्ये अवैध जुगार अड्डा

युनिट ४ च्या कारवाईत सहा जणांना अटक; ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त

by Admin
Spread the love

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी :उच्चभ्रू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोढा सोसायटीतील एका फ्लॅटमध्ये अवैध जुगार व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट चारने अचानक छापा टाकून सहा जणांना अटक केली आहे. केवळ दोन हजार रुपये भाड्याने घेतलेल्या फ्लॅटमध्ये जुगाराचा धंदा सुरू असलेला आढळला. याप्रकरणी युनिट ४ चे पोलीस नाईक अंजनराव सोडगिर यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली (LodhaSocietyCrime)आहे.

 

अटक करण्यात आलेल्यांमध्ये अरुण लालबहादुर खरोसे (वय 27, रा. सांगवी), संजयकुमार रेणसिद्ध गुत्तेदार (वय 30, रा. जुनी सांगवी), संदिप राजेंद्र वडमारे (वय 35, रा. पिंपळे गुरव), सुरेश दिगंबर माळी (वय 45, रा. जुनी सांगवी), अमन संजु सेनानी (वय 35, रा. पिंपळे गुरव) आणि चित्रसेन भगवान घरवाडवे (वय 33, रा. पिंपळे गुरव) यांचा समावेश आहे. हे सर्वजण ड्रायव्हर, बार मॅनेजर, डिलिव्हरी बॉय व हॉटेल व्यवसायात कार्यरत असल्याची माहिती(LodhaSocietyCrime )पोलिसांनी दिली.

 

घटनेविषयी पोलिसांनी सांगितले की, लोढा सोसायटीमधील बिल्डिंग क्रमांक 28 मधील फ्लॅट नंबर 1207 मध्ये अवैध जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार 27 नोव्हेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास पोलिसांच्या पथकाने छापा टाकून ताशपत्ते, रोकड व मिळून एकूण 75 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. घटनास्थळी जुगार खेळताना सहा जणांना रंगेहात (LodhaSocietyCrime)पकडण्यात आले.

 

उच्चभ्रू सोसायटीमध्ये वाढता गैरवापर

लोढा सोसायटी ही शहरातील प्रतिष्ठित सोसायट्यांपैकी एक असून येथे अनेक नागरिक राहतात. मात्र, काही फ्लॅट मालक दररोज दोन ते तीन हजार रुपये घेऊन फ्लॅट प्रायव्हेट पार्ट्या, व्यावसायिक उपक्रम किंवा इतर संशयास्पद कारणांसाठी भाड्याने देत असल्याचे तक्रारीतून समोर येत आहे. त्यामुळे सोसायटीच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले (LodhaSocietyCrime)आहेत.

 

या प्रकरणी शिरगाव पोलिसांनी महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम 1887 अंतर्गत कलम 4 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस फौजदार काळे (LodhaSocietyCrime)करीत आहेत.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00