Home माझं पिंपरी चिंचवड Ajit Pawar Tribute:एमआयडीसी परिसरात अजितदादांचे स्मारक उभारावे – संदीप बेलसरे

Ajit Pawar Tribute:एमआयडीसी परिसरात अजितदादांचे स्मारक उभारावे – संदीप बेलसरे

एमआयडीसीला ‘अजित नगर’ नाव देण्याची मागणी – सुरेश म्हेत्रे

by Admin
Spread the love

पिंपरी, पुणे | दि. ३ फेब्रुवारी २०२६:पिंपरी-चिंचवड शहरातील एमआयडीसी परिसरात कार्यरत असलेल्या लघुउद्योजकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांनी नेहमीच सकारात्मक आणि तत्पर भूमिका घेतली होती. वीज, पाणी, रस्ते, वाहतूक, मिळकत कर, संघटनेसाठी जागा उपलब्ध करून देणे, लघुउद्योजकांचे पुनर्वसन अशा अनेक प्रश्नांमध्ये त्यांनी वेळोवेळी हस्तक्षेप करून प्रभावी तोडगे काढले, असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी (Ajit Pawar Tribute) केले.

स्व. अजितदादा पवार यांच्या स्मृती जतन करण्यासाठी पिंपरी-चिंचवड एमआयडीसी परिसरात त्यांचे स्मारक उभारावे, यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) तसेच राज्य सरकारकडे संघटनेच्या वतीने पाठपुरावा केला जाईल. हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असेही बेलसरे यांनी(Ajit Pawar Tribute) सांगितले.

स्व. अजितदादा पवार यांचे २८ फेब्रुवारी रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या सोबत विमानात असलेल्या इतर चार व्यक्तींचाही या अपघातात मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण राज्य शोकसागरात बुडाले असून, त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेच्या वतीने सोमवारी मोशी प्राधिकरण सेक्टर ४ येथील पर्ल बँक्वेट हॉलमध्ये श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले (Ajit Pawar Tribute) होते.

या वेळी संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, उपाध्यक्ष विनोद नाणेकर, सचिव जयंत कड, प्रसिद्धी प्रमुख विजय खळदकर, संचालक संजय सातव, विनोद मित्तल, नवनाथ वायाळ, भारत नरवडे, अतुल इनामदार, सचिन आदक, तात्या सपकाळ, सुरेश म्हेत्रे, संजय भोसले, माणिक पडवळ, बशीरभाई तरसगार आदी लघुउद्योजक उपस्थित(Ajit Pawar Tribute) होते.

यावेळी बोलताना सुरेश म्हेत्रे म्हणाले की, लघुउद्योजकांच्या प्रश्नांबाबत नेहमी संवेदनशील असणारे अजितदादा पवार यांच्या अकाली जाण्यामुळे राज्याने एक कणखर नेतृत्व गमावले आहे. पिंपरी-चिंचवडमधील लघुउद्योजकांच्या दृष्टीने ते लोहपुरुष होते. त्यांच्या स्मरणार्थ येथे एखादा विकासात्मक प्रकल्प सुरू करावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त(Ajit Pawar Tribute) केली.

संघटनेचे संजय आहेर यांनी सांगितले की, पिंपरी-चिंचवडच नव्हे तर संपूर्ण राज्यातील लघुउद्योजकांना अजितदादा पवार यांनी नेहमी पाठबळ दिले. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून पिंपरी-चिंचवड एमआयडीसी परिसराला ‘अजित नगर’ असे नाव देण्यात यावे, यासाठी संघटनेने प्रयत्न (Ajit Pawar Tribute) करावेत.

हर्षल थोरवे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, सर्वसामान्यांच्या मनात घर केलेला आपला माणूस आपण गमावला आहे, ही भावना प्रत्येकाच्या मनात (Ajit Pawar Tribute) आहे.

यावेळी उपस्थित इतर लघुउद्योजकांनीही आपल्या भावना व्यक्त करत स्व. अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली. दोन मिनिटे मौन पाळून सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. पसायदानाने श्रद्धांजली सभेचा समारोप करण्यात(Ajit Pawar Tribute) आला.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00