(विशेष लेख )होणारे होणारच असते…
फक्त प्रत्येक गोष्टीची वेळ यायला हवी असते.
नमनालाच हे वाक्य का लावलंय, असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल. चुकीचा नाही.
पण विषयच असा आहे की, मन नको म्हणत असतानाही शब्दांना वाट करून द्यावीच (Social Media Rumors) लागते.
परवाच राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री, कडक शिस्तीचे, रोखठोक आणि कामासाठी ओळखले जाणारे नेते अजितदादा पवार यांचे दुःखद निधन झाले.कालच काटेवाडी येथील विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात, लाखोंच्या जनसमुदायाच्या साक्षीने त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले.
महाराष्ट्राच्या राजकारणाचा एक अध्याय तिथे शांतपणे बंद झाला.
पण दुर्दैव असे की…त्यांच्या चितेची राख अजून विझलेलीही नव्हती, आणि इकडे त्यांच्या राजकीय वारसदारावर चर्चा सुरू झाल्या.
निमित्त ठरले राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांचे एक विधान —
“दादांच्या मृत्यूनंतर त्यांच्या जागी सुनेत्रा पवार यांना (Social Media Rumors)उपमुख्यमंत्री करावे.”
एका वाक्याने राज्यभरात सोशल मीडियावर आग लागली.
व्हॉट्सॲप, फेसबुक — खरं तर फॉरवर्ड पोस्टसाठीच जास्त प्रसिद्ध असलेली ही माध्यमं — तिथे सत्य न पडताळता, संदर्भ न समजून, भावना न ओळखता पोस्ट्स इकडून तिकडे धावू लागल्या.
चॅनेलवाल्यांसाठी हा विषय म्हणजे टीआरपीचा हॉट केक.
डिबेट्स, ब्रेकिंग न्यूज, पॅनेल्स…
जणू काही अंत्यसंस्कार नव्हतेच, तर सत्ता रिक्त झाली आणि लगेच भरायचीच(Social Media Rumors) आहे!
पण एक प्रश्न सतत डोक्यात घुमत राहतो —
इतकी घाई खरंच गरजेची आहे का?
हा प्रश्न जर कुणाच्या संवेदनशील मनाला पडत नसेल,
तर मग या आभासी जगात उरलीसुरली संवेदनशीलताही संपली असेच म्हणावे (Social Media Rumors)लागेल.
अजितदादांच्या कुटुंबातील सदस्यांच्या मानसिक अवस्थेचा तरी विचार कुणी केला आहे का?
पत्नी, मुले, नातवंडं…
कालपर्यंत ज्यांचं आयुष्य एका मजबूत खांद्यावर टेकलेलं होतं, तो आधार एका क्षणात निघून गेला आहे.
मान्य आहे —
या जगात कोणाचेही कोणावाचून अडत नाही.
राजकारण तर अजूनच वेगळा खेळ.
राष्ट्रवादीसारखा मोठा पक्ष, त्यांचा प्रमुख गेला म्हटल्यावर पुढील वाटचाल ठरवणं अपरिहार्य आहे.
पण कालच?
अरे… ती चिता पूर्णपणे विझू तरी(Social Media Rumors) द्या!
सुनेत्रा ताईंना, त्यांच्या मुलांना थोडा वेळ द्या.
८५ वर्षांहून अधिक वय असलेले, अनेक व्याधींशी झुंज देणारे त्यांचे काका — त्यांच्या मनस्थितीचा तरी विचार करणार की नाही?
कसली ही घाई आहे आपल्याला?
तुमच्या चॅनेलचा टीआरपी वाढवण्यासाठी,
पेपरचा खप वाढवण्यासाठी,
तुम्ही बेसिक एथिक्स, शिष्टाचार, माणुसकीही बाजूला ठेवणार आहात का?
क्षणिक प्रसिद्धीपायी आपण किती खाली उतरणार (Social Media Rumors)आहोत?
त्याआधी हा अपघात की घातपात,
यावरून पसरवलेल्या अत्यंत घृणास्पद पोस्ट्स,
जातीय टिप्पणी,
कोर्टाच्या आधीच निकाल देऊन कुणाला तरी दोषी ठरवणारी ही वृत्ती नेमकी कुठून येते?
दादा राजकारणी म्हणून कसे होते,
हे सांगण्याइतका मोठा पत्रकार मी नाही.
आणि तसा दावा करण्याचाही माझा अधिकार नाही.
पण त्यांच्या मृत्यूनंतर सर्वत्र व्यक्त झालेली हळहळ,
डोळ्यांत आलेलं पाणी,
शब्द न फुटणारी शांतता —
हे अनुभवताना एक गोष्ट नक्की कळली…
ते माणूस म्हणून नक्कीच मोठे होते.
आणि म्हणूनच,
त्यांच्या चितेची राख विझतही नाही तोवर
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या चर्चा,
पोस्ट्स, अफवा, आरोप पाहून मन सुन्न होतं.
काहीच विचार मनात येत नाही का?
आपण कुठे चाललो आहोत?
कुठे हरवली आपली सहवेदना, आपली सुहिष्णुता?
इतके असंवेदनशील कधी आणि कसे झालो आपण?
प्रश्न आहेत…
प्रश्नच प्रश्न आहेत…
आणि उत्तर देण्यासाठी कुणीच (Social Media Rumors)नाही.
शेवटी एवढंच वाटतं —
राजकारण पुढेही चालेल, सत्ता येईल-जाईल, चेहरे बदलतील.
पण माणूस म्हणून आपण हरवत चाललो आहोत,
हे जर थांबवलं नाही…
तर उद्या
कोणाच्याही चितेभोवती उभं राहून
आपण फक्त बातम्या वाचत राहू,
आणि माणुसकी…
ती कधीच परत मिळणार(Social Media Rumors) नाही.
— विवेक कुलकर्णी
