पुणे : रक्षाबंधनाच्या पवित्र सणाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिवंगत नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देत भावनिक पोस्ट केली आहे. “आज राखीपौर्णिमा… पण दादा, तू सोबत नाहीस ही जाणीव मनाला खूप अस्वस्थ करत आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त (Ajit Dada Memories) केल्या.
२८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाले होते. या घटनेनंतर आलेल्या पहिल्याच राखीपौर्णिमेला सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या भावासोबतच्या आठवणी आणि त्यांच्याप्रती असलेला जिव्हाळा व्यक्त(Ajit Dada Memories) केला.
सुप्रिया सुळे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, सात महिन्यांपूर्वीची ती भीषण सकाळ आणि अजित पवार यांचे अचानक निघून जाणे आजही मनाला स्वीकारता येत नाही. लहानपणापासून एकत्र वाढताना झालेली भांडणे, एकमेकांवरील प्रेम आणि अभिमान या आठवणी आजही मनात ताज्या असल्याचे त्यांनी नमूद (Ajit Dada Memories) केले.
“आजही वाटतं, तू कुठूनतरी अचानक येशील, राखी बांधून घेशील आणि बहिणींसोबत गप्पागोष्टी करत पुन्हा कुटुंबात रमून जाशील,” अशा भावनिक शब्दांत त्यांनी अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा (Ajit Dada Memories) दिला.
राजकारणात दोघांनी वेगवेगळे मार्ग स्वीकारले असले, तरी भाऊ-बहिणीचे नाते कायमच चर्चेत राहिले. अजित पवार यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही, अशी भावना व्यक्त करत सुप्रिया सुळे यांनी, “तू जिथे असशील, तिथून तुझं प्रेम आणि आशीर्वाद असेच सदैव पाठीशी राहू दे,” अशी प्रार्थना(Ajit Dada Memories) केली.
सुप्रिया सुळे यांची ही भावनिक पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली असून, त्यांच्या भावना पाहून नागरिकांकडूनही हळहळ व्यक्त केली जात (Ajit Dada Memories) आहे.
