Home गुन्हे Crime News:गुन्हे शाखा युनिट–१ ची उल्लेखनीय कामगिरी

Crime News:गुन्हे शाखा युनिट–१ ची उल्लेखनीय कामगिरी

अवघ्या एका तासात वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातील २ लाखांचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या तीन महिला अटकेत आंतरराज्य गुन्हेगारी टोळीचा पर्दाफाश

by Admin
Spread the love

ताब्यात घेतलेल्या महिलांनी आपली नावे पुढीलप्रमाणे सांगितली —

ममता संजू सकट (वय ३०)

भाग्यश्री बबलू काळे (वय ३३)

सुमन प्रताप काळे (वय ३०)

(सर्व रा. फुलेनगर, येरवडा, पुणे | मूळ रा. गुलबर्गा, कर्नाटक)

महिला पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून २ लाख रुपये किमतीचे मणी मंगळसूत्र व सोन्याची चैन असा चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात (Crime News) आला.

याप्रकरणी संबंधित वयोवृद्ध महिलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून गुन्हा रजिस्टर क्रमांक ६४/२०२६ अन्वये भारतीय दंड विधानाच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात (Crime News) आला आहे.

तपासादरम्यान या तिन्ही महिलांवर कर्नाटक व महाराष्ट्रातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये चोरीसह गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती उघड झाली (Crime News) आहे.

भाग्यश्री बबलू काळे हिच्यावरील गुन्हे :

बांद्रा रेल्वे पोलीस ठाणे, गु.र.नं. १३१/२०१५ (कलम ३९२)

मानवत पोलीस ठाणे, जि. परभणी, गु.र.नं. ११५/२०१५ (कलम ३२५, ३२३)

अफजलपूर पोलीस ठाणे, गुलबर्गा, कर्नाटक (कलम ३२३, ३२४, ५०४, ५०६)

दादर रेल्वे पोलीस ठाणे, गु.र.नं. ३१७/२०१७ (कलम ३७९)सुमन प्रताप काळे हिच्यावरील गुन्हे :

गांधी चौक पोलीस ठाणे, विजयपुरा, कर्नाटक (गु.र.नं. ३३/२०२४, ६४/२०२४ – कलम ३७९)

बांद्रा पोलीस ठाणे, गु.र.नं. ३५७/२०१३ (कलम ३७९, ५११)

कुर्ला रेल्वे पोलीस ठाणे, गु.र.नं. ९७/२०१७ (कलम ३७९, ३४)

सदरच्या तिन्ही आरोपी महिलांना जप्त मुद्देमालासह निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडे पुढील तपासासाठी हजर करण्यात आले (Crime News) आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00