Home प्रेरणा / यशकथा Lerniverse School:ज्ञानोत्सवात चिमुकल्यांनी जिंकली उपस्थितांची मने

Lerniverse School:ज्ञानोत्सवात चिमुकल्यांनी जिंकली उपस्थितांची मने

पिंपरी-चिंचवड येथे लर्निव्हर्स स्कूल व भाषा अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ज्ञानोत्सवात चिमुकल्या विद्यार्थ्यांनी विज्ञान, नृत्य, संगीत व आरोग्य उपक्रमांतून उपस्थितांची मने जिंकली.

by Admin
Spread the love

या प्रसंगी भाषा अकॅडमीचे संस्थापक व अध्यक्ष दीपक पागे, सहसंचालिका प्रीती गायतोंडे, समुपदेशिका ज्योती जंगम, जर्मन भाषातज्ज्ञ गंधाली बारसोडे, डॉ. डी. वाय. पाटील शिक्षण संकुलाचे डॉ. आशिष चिंबळकर व डॉ. अनिकेत गरुड, तसेच लर्निव्हर्स स्कूलच्या संस्थापक-संचालिका प्रियंका नलावडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
दीपप्रज्वलन, सरस्वतीपूजन आणि चिमुकल्यांनी एका सुरात सादर केलेल्या रामरक्षेने सोहळ्याचा मंगलारंभ करण्यात आला. डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेदिक हॉस्पिटलच्या वतीने ध्यानधारणा प्रक्रियेची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. पारंपरिक वेषभूषेतील बालकांनी विविध नृत्य-गीतांचे सादरीकरण करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
मोकळ्या मैदानात सुमारे पंचेचाळीस चिमुकल्या ‘वैज्ञानिकां’नी उभारलेल्या विज्ञान प्रदर्शनातील वैविध्यपूर्ण प्रयोग हा परिसरातील एकमेव आणि वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम ठरला. या उपक्रमाला पालक व नागरिकांकडून भरघोस प्रतिसाद लाभला. विनामूल्य आरोग्य शिबिराचा पालकांनी लाभ घेतला, तर खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर सर्व वयोगटातील रसिकांनी मोठ्या उत्साहात ताव (Lerniverse School)मारला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी लर्निव्हर्स स्कूल रावेत शाखेच्या संचालिका रोहिणी पडळ, गहुंजे शाखेच्या संचालिका मोनिका देशपांडे, समन्वयक मेघा मिसाळ, खजिनदार मीनाक्षी पवार, भूषण कुदळे तसेच सर्व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन समीक्षा मिसाळ यांनी (Lerniverse School) केले


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00