Home पुणे Sugam Sangeet Rajani:सुगम संगीत रजनीच्या माध्यमातून संदीप उबाळे आणि योगिता गोडबोले यांनी मोरया रसिकांना केले तृप्त

Sugam Sangeet Rajani:सुगम संगीत रजनीच्या माध्यमातून संदीप उबाळे आणि योगिता गोडबोले यांनी मोरया रसिकांना केले तृप्त

मोरया गोसावी संजीवन समाधी सोहळ्याच्या 464व्या महोत्सवात संदीप उबाळे आणि योगिता गोडबोले यांच्या सुगम संगीत रजनीने रसिकांना मंत्रमुग्ध केले.

by Admin
Spread the love

ही सेवा अर्पण केली.

या संगीत रजनीसाठी पिंपरी चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव, जितेंद्र देव, केशव विद्वांस हे प्रमुख पाहुणे आणि यजमान म्हणून संपूर्ण वेळ कार्यक्रमस्थळी उपस्थित होते.

मराठी आणि हिंदी अशा मिश्र गीतांची अप्रतिम मेजवानी रसिकांना पहिल्याच दिवशी अनुभवता आली. एकाहून एक सुंदर आणि अवीट गाणी दोघांनी सादर करून आपल्या गायनाची जादू रसिकांवर पसरवली.

तुज मागतो मी आता या गीताने मैफिलीची सुरुवात झाली. टेलिव्हिजनच्या माध्यमातून अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या या गोड गळ्याच्या गायिकेने हे भावपूर्ण गीत अप्रतिम सादर केल्याने उपस्थित मोरया भक्तांनीही ऊत्स्फूर्त दाद दिली. त्यानंतर तिनेच गायलेल्या माय भवानी तुझे लेकरू या गीतालाही( Sugam Sangeet Rajani)भरभरून प्रतिसाद मिळाला.

मुळचा आकुर्डीचा असलेला, पण आपल्या दमदार गायनशैलीने संपूर्ण देशाचा लाडका गायक ठरलेला संदीप उबाळेने मन मंदीरा या गीताने आपल्या गायनाची सुरेख अनुभूती रसिकांना दिली आणि पुढे मैफिल अधिकच रंगत(Sugam Sangeet Rajani)गेली.

नावाची गोजिरी, मला वेड लागले, देवा काळजी रे, यारा सिली सिली, अभी मुझमें कहीं, मेरे ढोलना सुन, ये राते ये मौसम यांसारखी अनेक अजरामर गाणी या जोडीनं सादर करत संगीत रजनी अविस्मरणीय केली.

स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेच्या शीर्षक गीताचा गायक असलेल्या संदीपने छावा हे गीत उभे राहून सादर केले आणि क्षणात संपूर्ण श्रोतेवर्ग टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमला. योगिता गोडबोलेने कजरा मोहब्बत वाला हे आशाताई आणि शमशाद बेगम यांच्या आवाजातील लोकप्रिय गीत एकटीने सादर करून आपल्या बहुगुणी प्रतिभेची उत्तम झलक दाखवली.

पुण्यातील गारठा असूनही रसिक मंडपातून हालण्यास तयार नव्हते. या मैफिलीचा प्रत्येक क्षण जणू जादुई होता. अखेरीस संदीपने देवा श्री गणेशा हे ऊर्जावान गीत प्रेक्षकांनाही सामील करून अप्रतिमरित्या सादर केले आणि मैफिलीचा उत्कर्षबिंदू गाठला.

प्राजक्ता मांडके यांनी अत्यंत रसाळ, सहज आणि प्रभावी सूत्रसंचालन करत कार्यक्रमात अधिकच रंगत आणली. प्रत्येक गीताची माहिती कमी शब्दांत, पण योग्य तीच—अशी तिची शैली प्रेक्षकांना भावली.

या मैफिलीसाठी हार्मोनियमवर प्रसन्न बाम, सिंथेसायजरवर अनय गाडगीळ, तबला–ढोलकीवर नितीन शिंदे आणि रिदम मशीन–ऑक्टोपॅडवर अभय इंगळे यांनी अत्यंत सुरेख साथ दिली.

शेवटी, “पुन्हा या” अशा आग्रहाच्या विनंतीसह आयोजकांनी सर्व कलाकारांचा यथायोग्य सन्मान करून या अविस्मरणीय मैफिलीची सांगता (Sugam Sangeet Rajani)केली.

— विवेक कुलकर्णी


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00