Home पुणे Supermoon 2025:श्रीदत्त जयंतीची विशेष पर्वणी! २०२५ मधील अखेरचा ‘सुपरमून’ आज रात्रभर दिसणार

Supermoon 2025:श्रीदत्त जयंतीची विशेष पर्वणी! २०२५ मधील अखेरचा ‘सुपरमून’ आज रात्रभर दिसणार

श्रीदत्त जयंती आणि मार्गशीर्ष पौर्णिमेच्या शुभदिनी २०२५ मधील अखेरचा सुपरमून आज रात्रभर आकाशात दिसणार आहे. चंद्र १४% मोठा आणि ३०% अधिक तेजस्वी दिसणार असून भारतभर साध्या डोळ्यांनी या अप्रतिम दृश्याचा आनंद घेता येणार आहे.

by Admin
Spread the love

प्रतिनिधी:गुरुवार, ४ डिसेंबर हा दिवस खगोलप्रेमी आणि श्रद्धावंत दोघांसाठीही अत्यंत खास ठरणार आहे. श्रीदत्त जयंती आणि मार्गशीर्ष पौर्णिमा या शुभ योगावर आज आकाशात २०२५ सालातील अखेरचा ‘सुपरमून’ दर्शन देणार आहे. पंचांगकर्ते व खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिलेल्या माहितीनुसार, आजचा चंद्र नेहमीपेक्षा अधिक मोठा आणि उजळ  (Supermoon 2025) दिसणार आहे.

‘सुपरमून’ ही घटना तेव्हा होते, जेव्हा चंद्र पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ येतो आणि त्याच वेळी पौर्णिमा असते. या परिस्थितीत चंद्राचे दर्शन सामान्य दिवसांपेक्षा अधिक तेजस्वी (Supermoon 2025) आणि मोठे दिसते.

या विशेष खगोलीय घटनेविषयी दा. कृ. सोमण सांगतात की, चंद्र पृथ्वीपासून साधारण ३,८४,००० किलोमीटर अंतरावर असतो. मात्र आजच्या दिवशी तो पृथ्वीच्या अवघ्या ३,५६,९६२ किलोमीटर अंतरावर येणार आहे. त्यामुळे आज रात्री चंद्रबिंब १४ टक्के मोठे आणि ३० टक्के अधिक तेजस्वी (Supermoon 2025) दिसेल.

सुपरमूनचे दर्शन घेण्यासाठी कोणत्याही विशेष साधनांची गरज नाही. आज सायंकाळी ५.१८ वाजता सुपरमून पूर्व क्षितिजावर उगवेल आणि संपूर्ण रात्री आकाशात राहील. त्यानंतर उद्या सकाळी ७.१४ वाजता तो पश्चिमेस मावळेल. भारतातील सर्व नागरिकांना हे दृश्य साध्या डोळ्यांनी पाहता येणार (Supermoon 2025) आहे.

मार्गशीर्ष पौर्णिमा आणि श्रीदत्त जयंतीच्या योगावर ही महत्त्वाची घटना घडत असल्याने धार्मिक आणि ज्योतिषीय दृष्टिकोनातूनही हा दिवस विशेष मानला जात आहे. २०२५ मधील हा शेवटचा सुपरमून असल्याने खगोलप्रेमींसाठीही ही (Supermoon 2025) अनोखी संधी आहे.

दा. कृ. सोमण यांच्या मते, पुढील सुपरमूनचे दर्शन आता थेट २४ डिसेंबर २०२६ रोजी मिळणार आहे. त्यामुळे आज रात्री आकाशात चमकणाऱ्या या उजळ आणि भव्य चंद्राचे दर्शन नक्की  (Supermoon 2025) घ्यावे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00