पिंपरी चिंचवड (पुणे) : स्वयंसिद्धा प्रतिष्ठान, पिंपरी चिंचवड तर्फे सन २०२६ चा ‘स्वयंसिद्धा पुरस्कार’ ज्येष्ठ साहित्यिका प्रा. विजयाताई मारोतकर आणि उद्योजिका चारुलता (सोनू दीदी) पुरोहित यांना जाहीर करण्यात आला (Swanyasiddha Award 2026)आहे.
प्रा. विजयाताई मारोतकर या नागपूरच्या ज्येष्ठ साहित्यिका असून त्यांचा ‘पोरी जरा जपून’ हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रासह राज्याबाहेर आणि परदेशातही गाजला आहे. त्या माय मराठी प्रतिष्ठान, नागपूर तसेच विदर्भ लेखिका संघ यांच्या अध्यक्षा आहेत. साहित्य, संस्कृती आणि महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात त्यांनी मोलाचे योगदान दिले (Swanyasiddha Award 2026)आहे.

चारुलता (सोनू दीदी) पुरोहित या पुण्यातील श्री महालक्ष्मी कॅटरर्स यांच्या सर्वेसर्वा आहेत. अल्पवयातच त्यांनी उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले असून विविध सामाजिक उपक्रमांतही त्या सक्रिय सहभाग नोंदवत (Swanyasiddha Award 2026)आहेत.
ही’ माहिती स्वयंसिद्धा प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सविता इंगळे यांनी (Swanyasiddha Award 2026)दिली.
