स्थानिकांच्या मते, गेल्या एक ते दीड वर्षांत या परिसरात चार ते पाच वेळा पाईपलाइन फुटीच्या घटना घडल्या आहेत. पाण्यासारख्या महत्त्वाच्या संसाधनाचा असा सतत होणारा अपव्यय थांबवण्यासाठी योग्य उपाययोजना न केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. मेट्रो प्रकल्प अधिकारी आणि कर्मचारी वारंवार होणाऱ्या या त्रुटीकडे लक्ष देत नसल्याची नाराजी व्यक्त (Water Wastage Nigdi)होत आहे.
भारतीय जनता पार्टीचे पिंपरी-चिंचवड शहरातील कार्यकर्ता सचिन काळभोर यांनी या घटनांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. “पाईपलाइन फुटीच्या वारंवार होणाऱ्या घटनांकडे ना मेट्रो अधिकारी लक्ष देत आहेत, ना पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्तांनी आजपर्यंत ठोस कारवाई केली आहे. मेट्रो ठेकेदारांवर फौजदारी गुन्हा नोंदवावा, जेणेकरून असा निष्काळजीपणा थांबेल.अशी आशा त्यांनी व्यक्त(Water Wastage Nigdi) केली
स्थानिक नागरिकांनीही तातडीने कायमस्वरूपी दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर अशा घटना गंभीर असून त्यावर तत्काळ उपाययोजना करण्याची गरज असल्याचे नागरिकांची स्पष्ट (Water Wastage Nigdi )मागणी आहे.
