
निगडी: निगडी ते पिंपरी मेट्रो रेल्वेच्या सुरू असलेल्या कामामुळे मुंबई–पुणे महामार्गावरील निगडी बस स्टॉपजवळ पाईपलाइन फुटण्याच्या घटना पुन्हा समोर आल्या आहेत. मेट्रो पिलरच्या जवळील पाईपलाइन फुटल्याने हजारो लिटर पाणी रस्त्यावर वाहून गेले. तातडीचा उपाय म्हणून ठिकाणी दगड ठेवून पाण्याचा वेग रोखण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचेही (Water Wastage Nigdi)दिसून आले.
