Home आरोग्य Nigdi Pothole Accident:भक्ती शक्ती उड्डाणपूल परिसरातील खड्ड्यांमुळे अपघात; मेट्रो अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

Nigdi Pothole Accident:भक्ती शक्ती उड्डाणपूल परिसरातील खड्ड्यांमुळे अपघात; मेट्रो अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

by Admin
Spread the love

 

या संदर्भात पिंपरी-चिंचवड भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता सचिन काळभोर यांनी मेट्रो प्रकल्प अधिकाऱ्यांची निष्काळजी भूमिका उघड केली आहे. त्यांच्या मते, रस्ते खोदून तसेच पडलेले असतानाही सुरक्षा रक्षकांची व्यवस्था नाही, दिशादर्शक फलक लावलेले नाहीत आणि अपघात टाळण्यासाठी आवश्यक ती(Nigdi Pothole Accident ) खबरदारीही घेतलेली नाही.

 

काळभोर यांनी सांगितले की, श्रीकृष्ण मंदिर ते अंकुश चौक हा मार्ग सहा महिन्यांपासून बंदच आहे. पर्यायी रस्ता नसल्यानं नागरिकांना मोठ्या खड्ड्यांमधूनच वाहन चालवावे लागत आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही मेट्रो अधिकाऱ्यांनी कोणतीही दखल घेतली नाही, त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेला धक्का( Nigdi Pothole Accident)बसत आहे.

 

निगडी ते पिंपरी मेट्रो मार्गाच्या कामामुळे मुंबई–पुणे महामार्गासह परिसरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे वाढले आहेत. गेल्या काही महिन्यांत अनेक अपघात घडले असूनही ठेकेदार आणि प्रकल्प अधिकारी दुरुस्ती करण्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे आरोप नागरिक आणि स्थानिक कार्यकर्त्यांकडून होत(Nigdi Pothole Accident) आहेत.

 

काळभोर यांनी टीका करताना म्हटले की, राजकीय दबावामुळे अनेक महत्वाची प्रकरणे दडपली जात आहेत. वारंवार अपघात होत असतानाही मेट्रो प्रकल्प अधिकारी परिस्थितीकडे दुर्लक्ष करत आहेत. नागरिकांनी जीव धोक्यात घालून प्रवास करणे भाग पडत असून या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल(Nigdi Pothole Accident) करण्याची मागणी त्यांनी केली.

 

या सर्व घडामोडींनंतर पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्तांना लेखी निवेदन देण्यात आले आहे. रस्त्यांची तातडीने दुरुस्ती, खड्डे बुजवणे, सुरक्षा रक्षक नेमणे आणि दिशादर्शक फलक लावणे या बाबत त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात(Nigdi Pothole Accident) आली आहे.

स्थानिक नागरिकांनीही या समस्येबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मेट्रो प्रकल्प महत्वाचा असला तरी नागरिकांची सुरक्षा अग्रक्रमावर असली पाहिजे, असे मत अनेकांनी व्यक्त केले. आता प्रशासन पुढील पावले कशी उचलते याकडे(Nigdi Pothole Accident )सर्वांचे लक्ष आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00