20
पिंपरी प्रतिनिधी :मुळशी तालुक्यातील लवळे फाटा परिसरात शनिवारी (दि. २२) सकाळी झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. वैभव मालपोटे (वय २२) असे मृत तरुणाचे नाव(Crime News) आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैभव मालपोटे आपल्या दुचाकीवरून जात असताना समोरून येणाऱ्या भरधाव डंपरने त्यांना जोराची धडक दिली. अपघातात ते गंभीर जखमी झाले आणि उपचारापूर्वीच त्यांचा (Crime News)मृत्यू झाला.
या प्रकरणी वैभव यांचे नातेवाईक गोविंद बाबूराव मालपोटे (रा. कातरखडक, ता. मुळशी) यांनी बावधन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून डंपर चालक बाबाराव सोनबा पवार (वय ३६, रा. उरवडे, ता. मुळशी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात (Crime News)आला आहे.
पोलिसांनी पुढील तपास (Crime News) सुरू केला आहे.
