Home आरोग्य Sangvai Blood Camp:सांगवीत गुजर स्नेहवर्धिनीच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५० रक्त पिशव्या संकलित

Sangvai Blood Camp:सांगवीत गुजर स्नेहवर्धिनीच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५० रक्त पिशव्या संकलित

by Admin
Spread the love

  1. पिंपरी प्रतिनिधी : गुजर स्नेहवर्धिनीच्या वतीने सांगवी गुजर बोर्डिंग येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. शिबिरादरम्यान तब्बल ५० रक्त पिशव्यांचे संकलन झाले असून, या मौल्यवान रक्तदानामुळे अनेक गरजू रुग्णांना दिलासा मिळणार आहे.

डॉ. डी. वाय. पाटील ब्लड सेंटर, पिंपरी यांच्या तज्ञ वैद्यकीय पथकाचे सहकार्य आणि गुजर स्नेहवर्धिनीच्या स्वयंसेवकांच्या समन्वयामुळे संपूर्ण शिबिर नियोजनबद्ध आणि सुरळीतपणे पार पडले.

 


 

 

 

 

 

 

गुजर स्नेहवर्धिनीचे अध्यक्ष अजय गुजर यांनी सांगितले की, रक्तदात्यांचा नि:स्वार्थ सहभाग आणि स्वयंसेवकांच्या सततच्या मेहनतीमुळे हे शिबिर यशस्वी ठरले. समाजासाठी दिलेले हे योगदान प्रेरणादायी असल्याचे ते म्हणाले.

 

शिबिराच्या आयोजनात मदत करणाऱ्या सर्व मान्यवरांचे संस्थेमार्फत विशेष आभार मानण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमोद चौधरी, मनिष पाटील, भूषण गुजर (वाडी-शिरपूर), सामर्थ्य पाटील, रुपेश पाटील, सचिन शहा, महेंद्र महाजन, भुषण पाटील, तुषार पाटील, प्रदीप पाटील, जयवंत पाटील, राजू पाटील, संदीप पाटील, गोपाळ चौधरी, शाम चौधरी आदी मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली. समाजबांधवांचा सहयोग शिबिराच्या यशात महत्त्वाचा ठरला.

 

रक्तदान शिबिर यशस्वी करण्यात थेट किंवा अप्रत्यक्ष योगदान देणाऱ्या सर्व रक्तदाते, स्वयंसेवक आणि उपस्थित मान्यवरांचे गुजर स्नेहवर्धिनीच्या वतीने आभार मानण्यात आले. या उपक्रमातून सामाजिक जबाबदारीची सकारात्मक भावना अधिक दृढ झाली आहे

.

 

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00