पिंपरी, दि. : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विविध कार्यालयांमध्ये दररोज मोठ्या संख्येने नागरिक विविध कामांसाठी येत असतात. त्यांच्या तक्रारी, सूचना आणि मागण्या संवेदनशीलतेने व संयमाने ऐकून त्यावर तातडीने कार्यवाही करण्यास प्राधान्य द्यावे, असे स्पष्ट निर्देश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सर्व विभागप्रमुख आणि अधिकाऱ्यांना दिले (Citizen Grievances)आहेत.
महानगरपालिकेत नागरिकांच्या तक्रारी, सूचना आणि विविध विषयांवर प्रत्यक्ष संवाद साधण्यासाठी प्रत्येक मंगळवार व गुरुवारी दुपारी ४ ते सायंकाळी ६ या वेळेत ‘नागरिक भेट’ कार्यक्रम आयोजित केला जातो. या उपक्रमात विविध विभागांशी संबंधित प्रश्न मांडण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक आयुक्त कार्यालयात येत (Citizen Grievances)असतात.
मात्र, नागरिकांची वाढती संख्या तसेच राज्य व केंद्र शासनाच्या महत्त्वपूर्ण बैठका आणि स्थानिक स्तरावरील अत्यावश्यक बैठका यांमुळे प्रत्येक नागरिकाला अपेक्षित वेळ देणे अनेकदा शक्य होत नाही. त्यामुळे नागरिकांनी प्रथम आपले प्रश्न, तक्रारी आणि मागण्या संबंधित विभागप्रमुखांकडे मांडाव्यात, असे आवाहन आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी केले (Citizen Grievances)आहे.
ज्या तक्रारी तत्काळ निकाली काढणे शक्य आहे, त्यावर विलंब न करता कार्यवाही करण्यात यावी. तसेच, धोरणात्मक निर्णय आवश्यक असलेल्या प्रकरणांमध्ये संबंधित नागरिकांना वस्तुस्थिती आणि पुढील कार्यवाहीबाबत स्पष्ट माहिती देण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना (Citizen Grievances)दिल्या.
याबाबत आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले, “पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन नागरिककेंद्री आणि उत्तरदायी कामकाजासाठी कटिबद्ध आहे. नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे प्रभावी निराकरण करणे हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. सर्व विभागप्रमुखांना नागरिकांच्या तक्रारी प्राधान्याने सोडविण्याचे निर्देश देण्यात आले असून त्याचे पालन न झाल्यास संबंधित खातेप्रमुखांवर कारवाई करण्यात येईल. नागरिकांना अधिक सुलभ, पारदर्शक आणि प्रभावी सेवा मिळावी यासाठी नागरिक भेटीचे नियोजन आणि तक्रार निवारण प्रक्रिया अधिक सक्षम करण्यात येत (Citizen Grievances)आहे.”
