चिंचवड (प्रतिनिधी): चिंचवड परिसरात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवर दोन कामगारांमधील किरकोळ वादाने अचानक हिंसक वळण घेतल्याने एकाची जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली (Chinchwad Crime) आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. काम सुरू असताना दोन कामगारांमध्ये वाद झाला. हा वाद चिघळत गेल्यानंतर संतप्त झालेल्या एका कामगाराने दुसऱ्याला तिसऱ्या मजल्यावरून खाली फेकल्याचा आरोप आहे. खाली पडल्याने संबंधित कामगाराचा जागीच मृत्यू (Chinchwad Crime)झाला.
घटनेनंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला असून तो सध्या फरार आहे. त्याचा शोध घेण्यासाठी चिंचवड पोलिसांकडून विशेष पथके तयार करण्यात आली (Chinchwad Crime) आहेत.
दरम्यान, मृत कामगाराचा मृतदेह शवविच्छेदनासाठी वायसीएम रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले (Chinchwad Crime) होते.
पुढील तपास सुरू
या घटनेमागील नेमका वाद, आरोपी व मृत व्यक्तीमधील संबंध तसेच पूर्वीपासून काही वाद होता का, याचा सखोल तपास पोलिसांकडून केला जात (Chinchwad Crime) आहे.
