Home गुन्हे Knife Attack Ravet:रावेतमध्ये भंगार विक्रेत्यावर चाकू हल्ला | धर्मराज चौकात धक्कादायक घटना

Knife Attack Ravet:रावेतमध्ये भंगार विक्रेत्यावर चाकू हल्ला | धर्मराज चौकात धक्कादायक घटना

रावेत येथील धर्मराज चौकात भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या भंगार विक्रेत्यावर चाकूने हल्ला. आरोपी अनिल चव्हाण अटकेत, जखमीवर उपचार सुरू.

by Admin
Spread the love

प्रतिनिधी-रावेत येथील धर्मराज चौक परिसरात दोन व्यक्तींमधील भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या एका भंगार विक्रेत्यावर चाकूने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाले  (Knife Attack Ravet)आहेत.

याप्रकरणी महादेव दिलीप बिरादार (वय ४५, रा. रावेत) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अनिल हौसिलाल चव्हाण (रा. धर्मराज चौक, रावेत) याला अटक केली (Knife Attack Ravet) आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महादेव बिरादार हे रावेत येथील होंडा शोरूमसमोरील फूटपाथवर उभे असताना त्यांचे परिचित अनिल चव्हाण आणि शेलार नावाच्या व्यक्तीमध्ये वाद सुरू होता. हा वाद शांत करण्यासाठी बिरादार मध्यस्थी करण्यासाठी (Knife Attack Ravet) गेले.

मात्र, याच गोष्टीचा राग मनात धरून अनिल चव्हाण याने बिरादार यांच्याशी शिवीगाळ सुरू केली. त्यानंतर रागाच्या भरात आरोपीने जवळील चाकू काढून बिरादार यांच्या डाव्या हाताच्या दंडावर आणि मनगटावर वार केले. या हल्ल्यात बिरादार गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू (Knife Attack Ravet) आहेत.

या प्रकरणाचा पुढील तपास रावेत पोलीस करत  (Knife Attack Ravet) आहेत.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00