प्रतिनिधी – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या (PCMC) आयुक्तपदी नियुक्त झालेले डॉ. विजय नामदेव सूर्यवंशी यांनी आज प्रभारी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडून अधिकृतपणे पदभार स्वीकारला. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेला अतिरिक्त पदभाराचा कालावधी संपुष्टात आला असून महापालिकेला पूर्णवेळ आयुक्त लाभले (PCMC Commissioner) आहेत.
महापालिकेचे तत्कालीन आयुक्त शेखर सिंह यांची ७ ऑक्टोबर २०२५ रोजी नाशिक कुंभमेळा आयुक्तपदी बदली करण्यात आली होती. त्यानंतर महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्याकडे पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला होता. गेल्या सुमारे पाच महिन्यांपासून ते ही जबाबदारी सांभाळत (PCMC Commissioner) होते.
अतिरिक्त पदभारामुळे महापालिकेच्या केवळ अत्यावश्यक कामांना प्राधान्य दिले जात असल्याने प्रशासकीय कामकाज काही प्रमाणात संथगतीने सुरू असल्याची नाराजी पदाधिकारी व नागरिकांकडून व्यक्त केली जात होती. याबाबत महापौर रवी लांडगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पूर्णवेळ आयुक्त देण्याची मागणीही केली(PCMC Commissioner) होती.
दरम्यान, राज्य शासनाने कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती केली. शासनाचे सहसचिव सुभाष उमराणीकर यांनी यासंदर्भातील आदेश जारी केला (PCMC Commissioner)होता.
या आदेशानंतर आज डॉ. सूर्यवंशी यांनी प्रभारी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडून अधिकृतपणे आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली. नव्या आयुक्तांच्या नियुक्तीमुळे महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजाला अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात (PCMC Commissioner)आहे.
