Home गुन्हे PCMC Traffic:त्रिवेणी नगर सिग्नलजवळ बेकायदेशीर रिक्षा थांबा; वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त

PCMC Traffic:त्रिवेणी नगर सिग्नलजवळ बेकायदेशीर रिक्षा थांबा; वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त

पिंपरी चिंचवडच्या त्रिवेणी नगर सिग्नलजवळ स्पाईन रोडवर बेकायदेशीर रिक्षा थांबा व अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी. स्थानिकांची तक्रार; प्रशासनाकडून कारवाईची मागणी.

by Admin
Spread the love

पिंपरी चिंचवड : त्रिवेणी नगर सिग्नलजवळील स्पाईन रोडवर बेकायदेशीर रिक्षा थांबा उभारण्यात आल्याने परिसरात वारंवार वाहतूक कोंडी होत असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार, लोखंडी बोर्ड व फ्लेक्स लावून सुमारे दहा ते पंधरा रिक्षा येथे थांबवल्या जात (PCMC Traffic) आहेत.

रस्त्यावर अतिक्रमण करून काही टपरीधारक व हातगाडीधारकांनीही व्यवसाय सुरू केल्याने वाहतुकीत अडथळे निर्माण होत आहेत. विशेषतः संध्याकाळी आणि रात्री अल्पोपहार व खाद्यपदार्थ विक्रीसाठी गर्दी वाढत असल्याने परिस्थिती अधिकच बिकट होते. त्यामुळे वाहनचालक व पादचारी यांना ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत (PCMC Traffic)आहे.

भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता सचिन काळभोर यांनी या प्रकरणी सारथी हेल्पलाईन तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्तालयाकडे तक्रार दाखल केली आहे. क्षेत्रीय कार्यालयाकडेही वेळोवेळी निवेदने देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, अद्याप संबंधित प्रशासन किंवा वाहतूक पोलिसांकडून ठोस कारवाई झालेली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त (PCMC Traffic)केली.

बेकायदेशीर रिक्षा थांबा व अतिक्रमण हटवून वाहतूक सुरळीत करण्यासाठी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत(PCMC Traffic) आहे.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00