Home महाराष्ट्र Sharad Pawar:शरद पवार प्रकृती अस्वस्थ; पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक मध्ये दाखल होणार

Sharad Pawar:शरद पवार प्रकृती अस्वस्थ; पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक मध्ये दाखल होणार

ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती पुन्हा बिघडली असून अशक्तपणामुळे त्यांना पुण्यातील Ruby Hall Clinic येथे दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या प्रकृती स्थिर असल्याची माहिती.

by Admin
Spread the love

प्रतिनिधी :राज्यातील ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मार्गदर्शक शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत पुन्हा एकदा चिंतेची बातमी समोर आली आहे. हलका अशक्तपणा जाणवत असल्याने त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथे दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, लवकरच त्यांना रुग्णालयात हलवले जाणार असल्याची माहिती समोर येत (Sharad Pawar)आहे.

अजित पवार यांच्या निधनानंतर पवार हे बारामतीतच थांबून कुटुंबीय व कार्यकर्त्यांना धीर देत होते. या काळात त्यांनी सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांची भेट घेऊन कुटुंबाला आधार दिला. मात्र, सततची धावपळ आणि मानसिक ताण यांचा परिणाम त्यांच्या प्रकृतीवर झाल्याचे सांगितले जात(Sharad Pawar) आहे.

अशक्तपणामुळे उपचारांची गरज

प्राथमिक माहितीनुसार, शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे त्यांना अशक्तपणा जाणवत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना सलाईन देण्यात येणार आहे. अशक्तपणा वगळता इतर कोणतीही गंभीर तक्रार नसून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे जवळच्या सूत्रांनी स्पष्ट केले (Sharad Pawar) आहे.

यापूर्वीही छातीत कंजेशनची तक्रार झाल्याने त्यांना बारामतीहून पुण्यात आणण्यात आले होते. त्यावेळी पाच दिवस उपचार घेतल्यानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले होते. त्यानंतर ते पुण्यातील निवासस्थानी विश्रांती घेत (Sharad Pawar)होते.

दरम्यान, पुन्हा एकदा प्रकृती अस्वस्थ झाल्याने सखोल वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत वैद्यकीय बुलेटिनची प्रतीक्षा (Sharad Pawar)आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00