प्रतिनिधी :पिंपरी-चिंचवड मनपाच्या (पीसीएमसी) आज (२० फेब्रुवारी २०२६) पार पडलेल्या सभेत शहरातील भटक्या कुत्र्यांचा वाढता प्रश्न केंद्रस्थानी राहिला. नागरिकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित करत भाजपचे नगरसेवक राजू मिसाळ यांनी लक्ष वेधण्यासाठी अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. त्यांनी सभागृहात ‘खेळण्यातील कुत्रा’ आणून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न (PCMC Meeting) केला.
मिसाळ यांनी सांगितले की, शहरातील विविध भागांत भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढत असून श्वानदंशाच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. अलीकडेच घडलेल्या काही घटनांचा उल्लेख करत त्यांनी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनत असल्याचे नमूद केले. प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी (PCMC Meeting)केली.
महापालिकेच्या आकडेवारीनुसार, गेल्या काही वर्षांत श्वानदंशाच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. २०१६-१७ मध्ये १०,५३३ इतकी असलेली संख्या २०२३-२४ मध्ये २४,१६९ वर पोहोचली असून, २०२४-२५ या आर्थिक वर्षात ऑक्टोबरपर्यंतच २८,०९९ घटना नोंदवण्यात आल्या आहेत. ही वाढ प्रशासनासाठी चिंतेचा विषय ठरत (PCMC Meeting)आहे.
सभेदरम्यान या मुद्द्यावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. सदस्यांनी निर्बंधित प्रजनन, लसीकरण मोहीम आणि प्रभावी नियंत्रण उपायांची अंमलबजावणी करण्याची मागणी (PCMC Meeting)केली.
भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर प्रशासन पुढे कोणती ठोस भूमिका घेते, याकडे शहरातील नागरिकांचे लक्ष लागले (PCMC Meeting)आहे.
