Home महाराष्ट्र Maharashtra Flood Relief:पूरग्रस्तांसाठी भाजप नगरसेवकांनी वर्षभराचे मानधन द्यावे; कार्यकर्त्यांची मागणी

Maharashtra Flood Relief:पूरग्रस्तांसाठी भाजप नगरसेवकांनी वर्षभराचे मानधन द्यावे; कार्यकर्त्यांची मागणी

by Admin
Spread the love

पिंपरी-चिंचवड : अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील भाजप नगरसेवकांनी आपले एक वर्षाचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करावे, अशी मागणी पक्षातील कार्यकर्त्यांकडून पुढे आली (Maharashtra Flood Relief) आहे.

गेल्या वर्षी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधींनी सामाजिक बांधिलकी जपत पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. भाजप कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी, “संकटाच्या काळात लोकप्रतिनिधींनी पुढे येणे गरजेचे आहे. एक वर्षाचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केल्यास पूरग्रस्त कुटुंबांना दिलासा मिळेल,” असे म्हटले(Maharashtra Flood Relief) आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपचे ८५ नगरसेवक निवडून आले आहेत. त्यांनी स्वेच्छेने मानधनाचा त्याग केल्यास पूरग्रस्तांना थेट आर्थिक मदत मिळू शकेल आणि समाजासमोर आदर्श निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त केला जात (Maharashtra Flood Relief)आहे.

 

या संदर्भात शहरातील आमदार महेश लांडगे , शंकर जगताप , उमा खापरे आणि अमित गोरखे यांनी पुढाकार घेऊन नगरसेवकांना आवाहन करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.लोकप्रतिनिधींनी स्वेच्छेने मदतीचा निर्णय घेतल्यास सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव अधिक दृढ होईल आणि जनतेचा विश्वासही बळकट होईल, असे मत व्यक्त करण्यात आले (Maharashtra Flood Relief)आहे.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00