Home आरोग्य Jnpv Walkethan:चरैवेति चरैवेति Walkathon | ज्ञान प्रबोधिनी निगडी आरोग्यव्रत उपक्रम

Jnpv Walkethan:चरैवेति चरैवेति Walkathon | ज्ञान प्रबोधिनी निगडी आरोग्यव्रत उपक्रम

ज्ञान प्रबोधिनी निगडी केंद्र पालक महासंघ आयोजित ‘चरैवेति चरैवेति’ Walkathon मध्ये २५००हून अधिक नागरिकांचा सहभाग. फिट इंडिया संकल्पनेवर आधारित आरोग्यव्रत उपक्रमाची यशस्वी सांगता.

by Admin
Spread the love

आरोग्यव्रताच्या प्रारंभी पालकांची रक्त तपासणी, सहनशक्ती व लवचिकता चाचणी घेण्यात आली. त्यानंतर पुढील दोन महिने तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली नियमित व्यायाम करण्यात आला. या कालावधीत घेतलेल्या उद्बोधनपर सत्रांमुळे शरीरासोबत मनही सजग (Jnpv Walkethan) झाले.

या Walkathon मध्ये विद्यार्थी, पालक, शिक्षक, माजी विद्यार्थी, युवक-युवती तसेच परिसरातील नागरिक अशा २५०० पेक्षा अधिक जणांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. चालण्यातले प्रत्येक पाऊल केवळ अंतर मोजणारे नव्हते, तर आरोग्य, शिस्त आणि सामूहिकतेची भावना रुजवणारे (Jnpv Walkethan)  होते.

कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती लाभली.Lions Club तर्फेश्री. योगेश वाके (अध्यक्ष), श्री. राजेश अग्रवाल (प्रांतपाल) तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.याशिवाय श्री. प्रवीण निकम (मुख्याधिकारी, नगर पंचायत वडगाव मावळ), श्री. जयराज देशमुख (अप्पर तहसीलदार, पिंपरी-चिंचवड), सौ. नीलम देसाई (टाटा ट्रस्ट सदस्य) तसेच राजकीय क्षेत्रातील आमदार सौ. उमाताई खापरे, नवनिर्वाचित नगरसेवक श्री. अमित गावडे, सौ. शैलजा मोरे व सौ. शर्मिला बाबर यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा व प्रेरणा (Jnpv Walkethan)  अधिक वाढली.

वय हा केवळ आकडा आहे हे अधोरेखित करत, ६ किमी गटातील ८२ वर्षीय सौ. पुष्पा भीमराव कुलकर्णी आणि ३ किमी गटातील ८५ वर्षीय श्री. गोपीनाथ चेट्टी यांचा तसेच ३ किमी गटातील सर्वांत लहान सहभागी विराज मुलगे याचा मंचावर विशेष सन्मान करण्यात आला. मोठ्यांकडून प्रेरणा घ्यावी आणि लहानांचे कौतुक करावे, असा प्रेरणादायी संदेश यावेळी देण्यात (Jnpv Walkethan)  आला.

या उपक्रमाचे प्रमुख म्हणून श्री. अमित गांगुर्डे यांनी जबाबदारी समर्थपणे सांभाळली. त्यांच्या नेतृत्वाखाली १५० हून अधिक पालक स्वयंसेवकांनी विविध विभागांत उत्साहाने काम ( Jnpv Walkethan) केले.

केंद्रप्रमुख वाचस्पती मनोज देवळेकर यांचे मार्गदर्शन या संपूर्ण उपक्रमाला दिशा देणारे ठरले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पालक महासंघाचे समन्वयक सौ. अनुजा बनाळे, कैलास दंडगव्हाळ आणि पंकज चापोलीकर यांनी नियोजनाची धुरा यशस्वीपणे सांभाळली.शाळेतील मुक्तिसोपन विभागाने सांगीतिक जबाबदारी प्रभावीपणे पेलली, तर इतर विभागांतील अध्यापकांनीही स्वयंसेवक म्हणून सक्रिय सहभाग नोंदवला.अभंगांच्या तालावर सादर करण्यात आलेला झूम्बा डान्स हे या Walkathon चे विशेष आकर्षण ठरले. शारीरिक हालचाल तीच, मात्र कानावर विठूमाऊलीच्या नामाचा गजर — “विठूचा गजर, हरिनामाचा झेंडा रोविला, ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा…” या भक्तिरसात सहभागी भान हरपून, शरीरावर ताण न देता आनंदाने झूम्बा करत (Jnpv Walkethan)  होते.

एकंदरीत, हे Walkathon केवळ एक कार्यक्रम न राहता आरोग्य, वाचनसंस्कृती, शिस्त आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुरेल संगम ठरले. चालताना घडलेली ही यात्रा संस्कारांची पेरणी करणारी आणि उद्याच्या निरोगी समाजाची पायाभरणी करणारी ( Jnpv Walkethan) ठरली.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00