Home महाराष्ट्र PCMC Mayor:पिंपरी-चिंचवड महापौर आरक्षण सोडत २२ जानेवारीला | PCMC Mayor Reservation 2026

PCMC Mayor:पिंपरी-चिंचवड महापौर आरक्षण सोडत २२ जानेवारीला | PCMC Mayor Reservation 2026

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेसह राज्यातील २९ महापालिकांमधील महापौर पदांच्या आरक्षणाची सोडत २२ जानेवारी २०२६ रोजी मुंबई येथे होणार आहे. भाजपाचे वर्चस्व असलेल्या PCMC मध्ये महापौरपदाबाबत उत्सुकता.

by Admin
Spread the love

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेसह राज्यातील २९ महानगरपालिकांमधील महापौर पदांच्या आरक्षणाची सोडत गुरुवारी, दि. २२ जानेवारी २०२६ रोजी काढण्यात येणार आहे. याबाबत महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने अधिकृत पत्रक जारी केले (PCMC Mayor )आहे.

राज्यमंत्री (नगर विकास) यांच्या अध्यक्षतेखाली ही आरक्षण सोडत प्रक्रिया गुरुवारी सकाळी ११ वाजता मंत्रालय, मुंबई येथे पार पडणार आहे. या बैठकीत राज्यातील सर्व २९ महानगरपालिकांमधील महापौर पदांचे आरक्षण निश्चित करण्यासाठी सोडत काढण्यात येणार (PCMC Mayor)आहे.

आगामी काळातील महापालिकांच्या राजकीय समीकरणांच्या दृष्टीने ही आरक्षण सोडत अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, या प्रक्रियेवर राज्यातील सर्व महानगरपालिका तसेच राजकीय वर्तुळाचे लक्ष(PCMC Mayor) लागले आहे.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत भाजपाने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले असून, एकूण १२८ पैकी ८४ नगरसेवक भाजपाचे निवडून आले आहेत. त्यामुळे महापौर पदासाठी कोणते आरक्षण पडणार आणि महापौरपदी कोण विराजमान होणार, याबाबत शहरात मोठी उत्सुकता निर्माण झाली(PCMC Mayor) आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00